Moss Farming : शैवाळ शेतीला प्रोत्साहन

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समुद्रीतृण व शैवाळ शेतीसंदर्भात अभ्यास गट स्थापन करण्याची घोषणा केली होती.
Moss Farming
Moss FarmingAgrowon

Nashik News : २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी समुद्रीतृण व शैवाळ शेतीसंदर्भात (Moss Farming) अभ्यास गट स्थापन करण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार राज्याच्या किनारी भागात समुद्रीतृण व शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाचे अवर सचिव संजय सवने यांनी शासन निर्णय काढला आहे.

समुद्रीतृण व शैवाळ शेती हा एक मृदाहीन शेतीचा प्रकार आहे. त्यासाठी लागवड करण्यात येणाऱ्या बहुतेक एकपेशीय वनस्पती या सूक्ष्मशैवलांच्या श्रेणीत मोडतात.

त्याला फाइटोप्लॅक्टन मायक्रोफॉइट्स किंवा प्लॅक्टोनिक शैवाळ असे संबोधले जाते. शैवाळ शेतीमध्ये मॅक्रो म्हणजे मोठ्या आकाराची शैवाळे असून त्यांची लागवड आणि कापणी केली जाते.

Moss Farming
Agriculture Irrigation News : पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका

या शैवाळांचा व्यावसायिक आणि औद्योगिक वापर देखील मोठ्या प्रमाणावर आहे. केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थेच्या २०१९ च्या अहवालानुसार भारतात समुद्री शैवळाचे उत्पादन हे १८ हजार ४०० टन एवढे होते. समुद्रीतृण आणि शैवाळ शेती कार्बन उत्सर्जन कमी करण्यास लाभदायक आहे. सांडपाणी प्रक्रिया, जैवइंधन व औद्योगिक वापरात याची उपयुक्तता आहे.

Moss Farming
Agriculture Scam : शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकवून व्यापाऱ्याची दिवाळखोरी

...असा आहे अभ्यास गट

मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव हे अभ्यास गटाचे अध्यक्ष असतील. तर उपसचिव (मत्स्यव्यवसाय) हे सचिव असतील. तर प्रधान सचिव (कृषी), प्रधान सचिव (पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग), आयुक्त(मत्स्यव्यवसाय), आयुक्त (कृषी), केंद्रीय क्षार व खारे रसायन संशोधन (भावनगर) गुजरात, केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था (मुंबई), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधी व सहआयुक्त मत्स्यव्यवसाय (सागरी) हे या अभ्यास गटाचे सदस्य असतील.

समितीची कार्यकक्षा अशी...

- समुद्रीतृण व शैवाळ शेती स्थापनेसाठी उपयुक्त समुद्रातील ठिकाणांची तांत्रिक संस्थेच्या सल्ल्याने निवड त्याचे अक्षांश-रेखांश प्राप्त करून घेणे, युनिट स्थापनेसाठी प्रक्रियेचे नियोजन व व्यवस्थापन

- राज्याच्या जलधी क्षेत्रात उपयुक्त ठरणाऱ्या समुद्रीतृण शैवाळांच्या प्रजातींची ओळख पटविणे

- समुद्रीतृण व शैवाळ शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना सुचविणे

- वेळोवेळी आवश्यक बाबींसाठी तांत्रिक व शास्त्रीय मार्गदर्शन करणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com