MAFSU Agrowon
ताज्या बातम्या

MAFSU : रिक्त पदे भरा; मग विद्यार्थी प्रवेशप्रक्रिया

VSI News : भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या माध्यमातून देशभरातील पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व त्याअंतर्गत असलेल्या पदवी व पदव्युत्तर महविद्यालयाचे संनियंत्रण होते.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : रिक्‍त पदांच्या परिणामी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठअंतर्गत राज्यातील तीन पदवी महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाऊ नये, अशी नोटीस भारतीय पशुवैद्यक परिषद (व्हीसीआय) कडून बजावण्यात आली आहे.

विद्यापीठ मुख्यालय असलेल्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचा देखील यात समावेश असल्याने हे प्रकरण आणखीनच संवेदनशील झाले असून १४ जुलै पर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे.

भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या माध्यमातून देशभरातील पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व त्याअंतर्गत असलेल्या पदवी व पदव्युत्तर महविद्यालयाचे संनियंत्रण होते. विद्यार्थ्यांना अपेक्षित सोयी सुविधा व पुरेशा प्राध्यापकांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे, असा उद्देश यामागे आहे. परंतु महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत असलेल्या राज्यातील सहा महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची ४५ ते ५० टक्‍केपेक्षा अधिक पदे रिक्‍त आहेत.

परिणामी त्याचा शिक्षणावर परिणाम होत असल्याने याविषयी ‘व्हीसीआय’ने गंभीर पावले उचलत यंदाच्या शैक्षणिक सत्राकरीता मान्यता न देण्याचा निर्णय घेतला आहे. ५-६ जून रोजी माफसूअंतर्गत पाच महाविद्यालयांची एकाचवेळी पाहणी करण्यात आली.

त्यावेळी तीन महाविद्यालयांत मान्य पदांपेक्षा कमी पद संख्या आढळून आली. त्यामध्ये परभणी, नागपूर आणि शिरवळ येथील महाविद्यालयांचा समावेश आहे. परिणामी ‘माफसू’ला १४ जुलैपर्यंत पदभरती न झाल्यास यंदा तीनही महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया थांबविण्याचा इशारा व्हीसीआयकडून देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे संसाधनाच्या उपलब्धतेवरुन ‘अ’ दर्जा या महाविद्यालयांना पूर्वी मिळाला होता. आता थेट प्रवेशावरच बंदी घातली जात असल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर, शिरवळ, परभणी या तीन महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात आली असून यंदाच्या शैक्षणिक सत्रात प्रवेशप्रक्रिया थांबविण्याचा इशारा त्यातून दिला आहे.
- डॉ. संदीप इंगळे, सदस्य, भारतीय पशुवैद्यक परिषद आणि सदस्य, कार्यकारी परिषद माफसू, नागपूर
शासनस्तरावरून रोटेशन संदर्भातील प्रक्रियेत असलेल्या त्रुटीच्या परिणामी भरती प्रक्रिया रखडली आहे. व्हीसीआय नोटीसनुसार १४ जुलैपर्यंत काय उपाययोजना शक्‍य होतात त्याचा अवलंब केला जाईल.
- डॉ. नितीन कुरकुरे कुलसचिव, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT