MAFSU : ‘माफसू’चे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. गडाख नियुक्त

‘माफसू’ला जागतिक लौकिक मिळवून देऊ, असा आशावाद त्यांनी प्रभार स्वीकारताना व्यक्त केला.
Dr. Sharad Gadakh
Dr. Sharad GadakhAgrowon

नागपूर : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे (MAFSU) कुलगुरू आशिष पातुरकर (Ashish Paturkar) यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीस विलंब होणार असल्याने‘ माफसू’चे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख (Dr. Sharad Gadakh) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने कुलगुरू निवड प्रक्रियेत बदलाचे धोरण स्वीकारले आहे. त्याकरिता राज्य सरकारला कायदा करावा लागणार आहे.

त्याला चार-पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया रखडली आहे. परिणामी, डॉ. गडाख यांच्याकडे ‘माफसू’चा प्रभार सोपविण्यात आला आहे.

Dr. Sharad Gadakh
MAFSU : ‘माफसू’ची कुलगुरू निवड प्रक्रिया लांबणार

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पातुरकर यांनी २२ जानेवारी २०१८ रोजी पदभार स्वीकारला होता. ‘माफसू’ला जागतिक लौकिक मिळवून देऊ, असा आशावाद त्यांनी प्रभार स्वीकारताना व्यक्त केला. मात्र गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात संशोधनात्मक स्तरावर कोणतीच उपलब्धी देण्यात त्यांना यश आले नाही.

Dr. Sharad Gadakh
MAFSU : हायडॅटिडोसिस रोगाचे निदान करणाऱ्या संशोधनाला पेटंट

मॉडल डेअरी, अकोला येथील पदवीधर पशुविज्ञान महाविद्यालय, मोर्शी येथील भूमिपूजन झालेले मत्स्य विज्ञान महाविद्यालय, ११ महिने सर्व नियुक्ती बंद, केवळ चार संचालक आणि दहा अनुकंपा तत्त्वावरील नेमणुका, डझनभर सामंजस्य करार करण्यात आले. परंतु त्यातून साध्य काहीच झाले नाही. संशोधन प्रकल्पाची संख्या घटली. सव्वा कोटी रुपयांच्या पशुरुग्णवाहिका धूळ खात पडल्या.

कार्यकारी परिषद आणि कुलगुरू ध्रुवीकरण, तक्रार निवारण समितीकडून काहीही निष्पन्न नाही. मराठवाड्याला ‘केव्हीके’साठी डावलले. उदगीरच्या उपकेंद्राला शेवटची घरघर लागली. वर्षभरात मुंबईच्या ५० फेऱ्या, तर उदगीर, परभणीकडे पाठ अशा प्रकारचा कार्यभार त्यांच्या काळात झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, शनिवारी (ता. २१) त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com