Gokul Milk Sangh agrowon
ताज्या बातम्या

Gokul Milk Sangh : मापात पाप करून गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक, संभाजी ब्रिगेडचा आरोप

Sambahji Brigade : दूध वजन काट्यांच्या माध्यमातून राज्यातील अनेक दूध संस्था याचा गैरवापर करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Milk Farmers : राज्यासह कोल्हापुरातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाचे मोजमाप इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांवर होत आहे. परंतु वजन काट्यांच्या माध्यमातून राज्यातील अनेक दूध संस्था याचा गैरवापर करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. दुधाची गुणवत्ता फॅट व एसएनएफ तपासणीतून नोंद करण्यात येते. या इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर शेतकरीवर्गाला फसवण्यासाठी कसा केला जातो याचे एक उदाहरण संभाजी ब्रिगेडचे राज्य सहसंघटक रूपेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

रुपेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची अॅक्युरसी १० ग्रॅम करण्याचे आदेश वैधमापनशास्त्र विभागाने दिले आहेत. शेतकऱ्यांचे १०० मिलीपेक्षा कमी दूध जे बिनमापी डेअरीला जात होते. त्या दुधाची नोंद होऊन दुधाचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे.

परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळसारख्या दूध संस्थांकडून याला आडकाठी घालण्याचे काम सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडवणारा गोकुळच पहिल्यांदा शेतकऱ्यांची लुबाडणूक करत असल्याची टीका रुपेश पाटील यांनी केली.

याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात दररोज तीन लाख शेतकरी दूध संस्थांना दूध विक्री करतात. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांवर शंभर मिली किंवा ग्रॅम अॅक्युरसी वापरुन सकाळ व संध्याकाळ असे १०० मिली ते २०० मिली दूध आणि त्याचे प्रतिदिन किमान १३ रुपयांची फसवणूक करतात. ही लूट थांबवून यासाठी शासनपातळीवर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिल्याची माहिती संभाजी ब्रिगेडच्या पाटील यांनी दिली.

दरम्यान, दुधाचे मोजमाप योग्य पध्दतीने झाले पाहिजे. यासाठी या तक्रारीची दखल घेवून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

निवेदनात दिलेले मुद्दे

१) इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची ऍक्युरेसी १० ग्रॅम करण्याचे आदेश वैधमापनशास्त्र विभागाने दिलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे १०० मिली पेक्षा कमी दूध जे बिनमापी डेअरीला जात होते त्या दुधाची नोंद होऊन दुधाचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दररोज तीन लाख शेतकरी दुध विक्री सहकारी संस्थेमार्फत करतात. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांवर शंभर मिली/ग्रॅम एक्युरसी वापरुन सकाळ व संध्याकाळ असे १०० मिली ते २०० मिली दूध व किमान १३ रुपयाचे दुध प्रति उत्पादकांकडून फसवून घेतात.

२) इलेक्ट्रॉनिक वजन काटा ग्राम मधून लिटर मध्ये कन्व्हर्ट करताना दुधासाठीचा कन्वर्जन फॅक्टर चुकीचा नोंदवून अनेक संस्था शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. यामध्ये प्रतिलिटर शंभर मिली दुधाची लूट होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दैनंदिन संकलन २२ लाख लिटर आहे. प्रति लिटर पाच रुपये लुबाडणूक होते. यामध्ये गोकुळचा सर्वात मोठा वाटा असल्याची माहिती रुपेश पाटील यांनी दिली.

३) दुधाचे फॅट सॅम्पल तपासण्यासाठी पाच मिली दूध घेण्याचे आदेश असताना देखील ५० ते १०० मिली दूध वरील कारणासाठी आवश्यकतेपेक्षा पाच दहा पटीने जादा घेतले जाते. या दुधाची रोज लाखो रुपये होतात यामुळेच बेकायदेशीर पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा तोटा होतो.

४) दुधाचे दर फॅटच्या गुणवत्तेनुसार ठरवले जातात. फॅट मशीन सदोष आहेत. या मशीनवर शासनाच्या कोणत्याही विभागाचे नियंत्रण नाही. याचाच गैरफायदा घेऊन सदर फॅट मशीनमध्ये फेरफार करून दुधाचे फॅट कमी नोंद केले जाते. यातून दूध संस्था शेतकऱ्यांची दैनंदिन लाखो रुपयांची फसवणूक करीत आहेत. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांचा व फॅट मशिन चा गैरवापर करत एका कोल्हापूर जिल्ह्यात दररोज दीड ते दोन कोटी रुपयांची फसवणूक शेतकरी दूध उत्पादकांची केली जात असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Forecast: गुरुवारपासून पावसाला सुरुवात होणार; राज्यात आज आणि उद्या पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Nepal Youth Protests: नेपाळ संसदेला घेराव, राष्ट्रपती भवनावर कब्जा; पंतप्रधान ओलींनी दिला राजीनामा

PM Kisan Maandhan Scheme: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार मासिक ३ हजार रुपये पेन्शन; केंद्र सरकारची आर्थिक आधार देणारी योजना!

Papaya Cultivation : पपईत पाणी निघत असल्याने चिंतेत भर

Sericulture : सोलापूर जिल्ह्यात रेशीम विभागाचे ‘रेशीम आपल्या दारी’ अभियान

SCROLL FOR NEXT