sandeep Shirguppe
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवारी (दि. १५) पार पडली.
सभा सुरळीत पार पाडण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्यावतीने तयारी करण्यात आली होती, तरी विरोधकांनी जोरदार विरोध करत आपले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला.
विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी प्रश्नांची सरबत्ती करताच सत्ताधारी गटाकडून गदारोळ होत असल्याचे पाहायला मिळाले.
शौमिका महाडिक यांना बोलण्यासाठी माईक देण्यात आला होता परंतु तो माईक बंद असल्याने शौमिका महाडिक आणि कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले.
शौमिका महाडिक यांनी सतेज पाटील यांना ओपन चॅलेंज देत. सतेज पाटील यांनी व्यासपीठावर मला बोलवावं. हातात माईक द्यावा. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सतेज पाटील यांनी द्यावीत.
गोकुळची सभा सुरु होण्यापूर्वीच महाडिक गट आक्रमक झाला होता. यावेळी सभासदांनी बॅरिगेट्स तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, चेअरमनचं भाषण झाल्यानंतर आम्ही उत्तर देऊ. खातरजमा करून पोलिसांनी सभासदांना आतमध्ये सोडलेलं आहे. राड्याची सुरुवात कुणी केली असेही पाटील म्हणाले
अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी ‘गोकुळ’चा कारभार चांगला चालला आहे, हे सांगत सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
माजी आमदार अमल महाडिक हे गोकुळच्या सभेदरम्यान ठिय्या मांडून बसले होते. अनेक कार्यकर्ते महाडिक यांच्यासोबत गोकुळच्या सभेत काय होते याकडे लक्ष ठेवून होते.
दरम्यान सभेस्थळी दोन्ही गटाचे लोक आक्रमक झाले होते. यामुळे पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच तापलेले वातवरण शांत झाले.
सत्ताधारी गटाकडून शौमिका महाडिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली नसल्याचा आरोप महाडिक गटाकडून करण्यात आला. यावर शौमिका महाडिकांनी प्रति सभा घेत विषय नामंजूर केले.