Rain  Agrowon
ताज्या बातम्या

Sindhudurg Rain : मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात रस्ते पाण्याखाली

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून गुरुवारी (ता. २७) पहाटेपासून पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. संततधार पावसामुळे काही रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. कुडाळ येथील एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला.

वादळीवाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. समुद्राच्या उधाणाचा किनारपट्टीच्या काही भागाला तडाखा बसला. जिल्ह्यातील सर्व नद्या इशारा पातळीनजीक पोहोचल्या आहेत.

जिल्ह्यात बुधवारी (ता. २६) दिवसभर मुसळधार पाऊस सुरूच होता. पावसामुळे जिल्ह्यातील नदीनाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. रात्रभर सर्वत्र संततधार सुरूच होती. गुरुवारी सकाळपासून देखील मुसळधार पाऊस सुरूच असून जिल्ह्याच्या काही भागांत पूरस्थिती आहे. कुडाळ तालुक्यातील तुकाराम राऊळ हे नदीला आलेल्या पुरात वाहून गेले. त्यांचा मृतदेह गुरुवारी (ता. २७) सकाळी आढळून आला.

वेंगुर्ल्यात संततधार सुरू आहे. पावसामुळे तालुक्यातील होडावडा पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वेंगुर्ले-सावंतवाडी वाहतुक ठप्प झाली. बांदा-दाणोली-बावळट मार्गावर अनेक ठिकाणी पुराचे पाणी आले आहे. मालवण तालुक्यातदेखील पावसाचा जोर कायम आहे. येथील एसटी बसस्थानकांसह अनेक भागांत पावसाचे पाणी साचले होते. रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले.

वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसासह वादळीवाऱ्याचा तडाखा बसला. यामध्ये काही घरांचे छप्पर कोसळले. एडगाव परिसरात वादळाचा जोर अधिक होता. समुद्राला उधाण असून त्याचा तडाखा किनारपट्टीच्या गावांना बसला.

मधली तोंडवळी येथील जेट्टीचा पायादेखील उद्ध्वस्त झाला तसेच काही झाडेदेखील उन्मळून पडली. तिलारी धरणातून विसर्ग सुरू असून नदीदेखील इशारा पातळी ओेलांडण्याची शक्यता आहे. तेरेखोल, वाघोटन, गडनदी नद्या इशारापातळीनजीक वाहत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT