Sangli News: मागील काही वर्षांपासून वाढलेल्या बेदाणा आयातीचा फटका स्थानिक उत्पादकांना बसत आहे. त्यामुळे झालेल्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी बेदाणा आयात धोरणात बदल करत आयातीवर निर्बंध लादण्याची मागणी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ, व्यापारी, शेतकरी राज्य आणि केंद्र सरकारकडे करू लागले आहेत. तसेच, बेदाण्यावरील आयात शुल्क तिप्पट करण्याची मागणी त्यांच्याकडून केंद्र सरकारला करण्यात येणार आहे..अफगानिस्तान, चीन, ग्रीससह इतर देशांतून भारतात मोठ्या प्रमाणावर बेदाणा आयात होत आहे. यामध्ये अफगाणिस्तानचा वाटा सर्वाधिक आहे. २०२४-२५ या वर्षात देशात एकूण ३१ हजार २८५ टन बेदाण्याची आयात झाली होती. यापैकी तब्बल २९ हजार ४५३ टन बेदाणा एकट्या अफगाणिस्तानमधून आला आहे. त्याखालोखाल चीनमधून मोठ्या प्रमाणावर बेदाणा भारतात दाखल झाला आहे. येथून २०२३- २४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये १ हजार ८१७ टनाने आवक वाढली..Bedana Trade: बेदाण्याचे सौदे आजपासून सुरू होणार.सांगली, सोलापूर व नाशिक या जिल्ह्यांत बेदाणा उत्पादन होते. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक बेदाणा तयार होतो. याशिवाय कर्नाटकातही मोठ्या प्रमाणावर बेदाण्याची निर्मिती होते. राज्यात तयार होणारा बेदाणा वर्षभर देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीस जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस, हवामान बदल आणि द्राक्ष उत्पादन घट यामुळे बेदाण्याचे उत्पादन कमी झाल्याने दरही चांगले राहिले आहेत. अशा परिस्थितीत दोन वर्षांपासून आयात होण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे चित्र आहे..अफगाणिस्तानमधून येणाऱ्या बेदाण्याला आयात शुल्क नाही. इतर देशांतून भारतात येणाऱ्या बेदाण्याला आयात कर आहे. त्यामुळे आयात कर वाचविण्यासासाठी व्यापारी चीन, इराक, इराण आणि पाकिस्तानचा बेदाणा अफगाणिस्तानमार्गे देशात पोहोचत आहे. हा बेदाणा निकृष्ट दर्जाचा असून त्यावर रंग लावून त्याची विक्री केली जात आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले..Bedana Demand: बेदाण्याला मागणी, उठाव कमी.पाच महिन्यांपूर्वी बेकायदेशीरपणे चीनचा बेदाणा बाजारात विक्रीस झाला होता. त्यानंतर दुसऱ्यांना अफगाणिस्तानचा म्हणून चीनचा बेदाणा सौद्यात आणला आहे. कायदेशीर आणि बेकायदेशीर मार्गे येणाऱ्या या बेदाण्याची झळ स्थानिक बेदाणा उत्पादकांना बसत आहे..मागील चार वर्षांतील बेदाणा आयातवर्ष टन२०२४-२५ ३१२८५२०२३-२४ २९४६८२०२२-२३ २६६४६२०२१-२२ २८०८१.केंद्राची चुकीचे धोरणे आयातवाढीस कारणीभूत आहेत. त्यामुळे द्राक्ष संघाने मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी आयातीचे धोरण बदलण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारशी पत्रव्यवहारही केला होता. मात्र त्याकडे अद्यापही लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा केंद्राकडे धोरणबदलासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ.दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बेदाण्याला प्रति किलोस शंभर रुपये असे आयात शुक्ल आकारले जात होते. मात्र आयात कराचे धोरण बदलल्याने सद्यःस्थितीला १०० टक्के अधिक जीएसटी असा आयात कर लागू आहे. आता केंद्राने प्रति किलोस ३०० रुपये अधिक जीएसटी असा आयात कर करावा, अशी आमची मागणी आहे.सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.