Pune News: शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतच्या व्यवहारावर भरावे लागणारे मुद्रांक शुल्क राज्य शासनाने आता माफ केले आहे. तसे आदेश महसूल विभागाने जारी केले आहेत..यासंदर्भातील महाराष्ट्र मुद्रांक कायद्यात (१९५८) केलेल्या दुरुस्तीबाबत नुकताच महसूल व वन विभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांनी जारी केला. ‘‘शेतकऱ्यांकडून होणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेती किंवा पीककर्जाशी संबंधित कार्यवाही केलेल्या अभिस्वीकृतीवर, रोखपत्र करारनाम्यावर किंवा हक्क विलेख निक्षेपपत्र, तसेच हडपपत्रावर आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क १ जानेवारी २०२६ पासून पूर्णतः माफ राहील,’’ असे सहसचिवांनी आदेशात म्हटले आहे..Farmer Loan Stamp Duty Waived GR: शेतकऱ्यांच्या २ लाखांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ, शासन आदेश जारी.१०० टक्के मुद्रांक शुल्क माफीची ही सवलत शेतकऱ्यांच्या दोन लाखांपर्यंतच्या तारण किंवा तारण गहाण, हमीपत्र गहाणखत, प्रतिभूती बंधपत्र, गहाणखत, गहाणाचे सूचनापत्र, घोषणापत्र किंवा त्यास संलग्न असलेल्या कोणत्याही कायदेशीर व्यवहाराला देखील लागू राहणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत मुद्रांक शुल्क माफी देण्याची शिफारस महसूल विभागाने दोन वर्षांपूर्वीच केली होती..Stamp Duty Abhay Yojana: मुद्रांक शुल्क अभय योजनेस मुदतवाढीबाबत प्रस्ताव सादर करा.प्रत्यक्षात त्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ मार्च २०२४ रोजी बीडमधील शेतकरी मेळाव्यात केली. त्यानंतर गेली दीड वर्षे ही सवलत दिली जात होती. परंतु दीड लाखापर्यंत व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेने अत्यल्प असते. त्यामुळे या घोषणेचा फारसा फायदा शेतकऱ्यांना मिळत नव्हता..शेतकऱ्यांना पिकासाठी सातत्याने कर्ज काढावे लागते. त्यामुळे कर्जविषयक नोंदणी व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्याची राज्य शासनाची भूमिका स्वागतार्ह आहे. तथापि, राज्यात आधी १.६० लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर मुद्रांक शुल्क माफी मिळत होती. त्यात आता केवळ ४० हजार रुपयांची वाढ केली आहे. महागाई वाढ लक्षात घेता ही सवलतीची रक्कम खूपच नगण्य ठरते. त्यामुळे किमान पाच लाखापर्यंतच्या व्यवहारांवर मुद्रांक माफी दिली असती तर शेतकऱ्यांना सोयीचे ठरले असते.शेखर गायकवाड, ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.