Fodder Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Pune Fodder Shortage : पुणे जिल्ह्यात महिनाभर पुरेल एवढाच चारा

Drought Condition in Pune : यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यात चारा पिकांच्या फार पेरण्या झाल्या नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चाराटंचाई निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘पावसाचे जवळपास साडे तीन महिने झाले आहेत. या कालावधीत पुरेसा पाऊस पडलेला नाही. यंदा कमी पावसामुळे जिल्ह्यात चारा पिकांच्या फार पेरण्या झाल्या नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी चाराटंचाई निर्माण झाली आहे.

सध्या जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच म्हणजेच अवघा ३३ लाख ९७ हजार ७४ मेट्रिक टन एवढाच चारा उपलब्ध आहे. त्यामुळे जनावरांना चारा पुरवायचा कसा, हा प्रश्‍न पशुपालकांना भेडसावत आहे,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला चारा प्रश्‍नाचा अहवाल नुकताच जिल्हा परिषदेने सादर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे उपलब्ध चारा पुढील महिन्यापर्यंतच पुरेल, अशी स्थिती आहे.

मागील रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रानुसार तसेच चालू खरीप हंगामातील पेरणी क्षेत्रानुसार उपलब्ध होणारा चारा आणि चारा लागवडीचे क्षेत्र यामधून अंदाजे ७४ लाख ७३ हजार मेट्रिक टन चारा मिळेल.

जिल्ह्यातील एकूण पशुधन हे ११ लाख ४४ हजार ८९३ एवढे आहे. यात लहान जनावरांची संख्या ३ लाख ४३ हजार ४६८, तर आठ लाख १ हजार ४२५ जनावरे आहेत. याशिवाय आठ लाख ६६ हजार ५३८ शेळ्या-मेंढ्या आहेत.

या पशुधनासाठी दररोज वाळलेला चारा हा ६ हजार ३५९ मेट्रिक टन, तर हिरवा चारा दररोज १५ हजार ८९७ मेट्रिक टन लागतो. म्हणजेच हा उपलब्ध चारा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुरेल, असे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

गतवर्षी ‘लम्पी स्कीन’मुळे पशुधन व्यवसायाला फटका बसला. आता या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने चाऱ्याअभावी जनावरांचे हाल होण्याची शक्यता आहे. सलग दुसऱ्या वर्षी पशुपालक अडचणीत सापडण्याची दाट शक्यता आहे. लहान जनावराला रोज तीन किलो वाळलेला चारा तर साडेसात किलो हिरवा चारा लागतो.

तर मोठी जनावरे सहा किलो वाळलेला आणि १५ किलो हिरवा चारा दररोज खातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात चारा कसा उपलब्ध करायचा, असा प्रश्‍न आहे. तर याचा परिणाम दूधपुरवठ्यावर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे येत्या काळात दूधदर वाढण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय उपलब्ध हिरवा, सुका चारा (टनांत)

तालुका---उपलब्ध असलेला चारा

भोर---२३,८८०

वेल्हा---५७५

मुळशी---७८५५

मावळ---१३,४७६

हवेली---८७७०९

जुन्नर---४,५९,३०५

खेड---४,१५,६५०

आंबेगाव---६,६२,३३५

शिरूर---५,४३,१०५

पुरंदर---२,२५,७७०

दौंड---२,७०,६५५

बारामती---३,०६,३४०

इंदापूर---३,८०,४२०

एकूण---३३,९७,०७४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Dam Water Discharge : भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग सुरू

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा प्रकरणी सीएससी चालकांविरुद्ध गुन्हा

Soybean Seed Rejection : सोयाबीनचे ५३ हजारांवर क्विंटल बियाणे नापास

Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT