Kardai Research Center  Agrowon
ताज्या बातम्या

Kardai Research Center : परभणी कृषी विद्यापीठाच्या करडई संशोधन केंद्रास राष्‍ट्रीय पुरस्कार

Parbhani Agriculture University : परभणी येथील करडई संशोधन प्रकल्‍पातर्फे आजवर अधिक उत्पादन देणारे दर्जेदार करडईचे वाण विकसित आणि प्रसारित केलेले आहेत.

Team Agrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्पास राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार रायपूर (छत्तीसगड) येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठात झालेल्‍या तेलबिया पिकांच्या वार्षिक सभेमध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) सहायक संचालक (तेलबिया) डॉ. संजय गुप्ता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

परभणी येथील करडई संशोधन प्रकल्‍पातर्फे आजवर अधिक उत्पादन देणारे दर्जेदार करडईचे वाण विकसित आणि प्रसारित केलेले आहेत. यामध्ये शारदा, परभणी कुसुम (पीबीएनएस -१२), परभणी ४०, परभणी ८६ (पूर्णा), परभणी सुवर्णा (पीबीएनएस -१५४), पीबीएनएस-१८४ या वाणांचा समावेश आहे.

परभणी कुसुम हा वाण राष्ट्रीय स्तरावर तुल्यबळ वाण म्हणून मागील १५ वर्षांपासून संशोधनामध्ये वापरला जातो, तसेच हा वाण देशभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे.

या संशोधन केंद्राने १०० टक्के यांत्रिकीकरणाच्या संशोधन शिफारशीच्या माध्यमातून करडईचे मध्यवर्ती प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन केलेले आहे. या केंद्राने केलेल्या संशोधन व विस्ताराच्या कार्यामुळे करडई उत्पादनात महाराष्ट्र राज्य देशभरात अग्रेसर आहे.

या सर्व बाबींची दखल घेत २०१७ ते २०२१ या कालावधीत केलेल्या संशोधन कार्यासाठी ‘आयसीएआर’अंतर्गत हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेतर्फे करडई संशोधन प्रकल्पास उत्कृष्ट तेलबिया संशोधन केंद्र पुरस्कार देऊन गौरविले आहे.

याबद्दल कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. श्यामराव घुगे व केंद्रातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. या वेळी डॉ. इंद्र मणी म्हणाले, की तेलबिया पिकात करडई हे महत्त्वाचे पीक असून विद्यापीठाचे अनेक करडईचे वाण शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत. ही विद्यापीठाकरिता अभिमानाची बाब आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT