Team Agrowon
अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन हार्वेस्टरचा वापर वाढत आहे. त्यामुळे वेळेवर आणि वेगाने काढणी करणे शक्य झाले आहे.
सध्या करडई पीक काढणीच्या अवस्थेत आहे. जातीनुसार करडई पीक १२० ते १४० दिवसात काढणीस तयार होते.
करडई पिकाच्या पाना-फुलावरील काटे पीक तयार होते, तेव्हा ते वाळतात आणि टणक होतात.
काढणी करताना हे काटे हाताला आणि पायाला टोचतात त्यामुळे करडई काढणीसाठी मजूर मिळत नाहीत.
करडई काढणीसाठी एकत्रित काढणी व मळणी यंत्र म्हणजेच कंबाइन हार्वेस्टर अतिशय उपयुक्त आहे.
करडईच्या झाडाचे बारीक तुकडे होऊन शेतात विखुरले जात असल्यामुळे जमिनीत मिसळून कुजल्यामुळे त्यापासून जमिनीस चांगले सेंद्रिय खत मिळते.
या यंत्राद्वारे काढणी केली असता स्वच्छ धान्य मिळते. बहुतेक वेळा शेतकरी शेतातून थेट बाजारात करडई विक्रीसाठी घेऊन जातात.