
परभणी ः यावर्षीच्या (२०२२) रब्बी हंगामात (Rabi Season) शुक्रवार (ता.२०) पर्यंत करईडची (kardai Sowing) परभणी १ हजार २८० हेक्टरवर (३७.९७ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात ६०४ हेक्टर (२९४.०८ टक्के) पेरणी (Rabi Sowing) झाली आहे.
दोन जिल्ह्यात एकूण १ हजार ८८४ हेक्टरवर करडईची पेरणी झाली आहे. गतवर्षी (२०२१) रब्बीत परभणी जिल्ह्यात ८७१.६ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यात ३१३ हेक्टरवर पेरणी (Sowing) झाली होती.
यंदा परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी तर हिंगोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली आहे.
रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक असलेल्या करडईच्या परभणी जिल्ह्यातील क्षेत्र २० हजार हेक्टरहून अधिक होते. परंतु गेल्या काही वर्षात विविध कारणांनी घट झाली आहे. यंदा क्षेत्र एक हजार हेक्टरवर आले आहे. करडई क्षेत्रात तब्बल ९५ टक्के घट झाली आहे.
गेल्या पाच वर्षातील करडईचे सरासरी क्षेत्र ३ हजार ३७१ हेक्टर एवढे आहे. यंदा परभणी, सेलू, मानवत, गंगाखेड चार तालुक्यातील करडईचे क्षेत्र २०० हेक्टरपेक्षा अधिक आहे.
परभणी तालुक्यातील क्षेत्रात सरासरीच्या तुलनेत २९६ टक्के वाढ झाली आहे. परंतु जिंतूर, पाथरी, सोनपेठ,पालम, पूर्णा तालुक्यात मात्र करडईच्या क्षेत्रातील घट कायम आहे.
यंदा जवसाची ११९ पैकी ३३.४ हेक्टर (२८.०७ टक्के), तिळाची ३३.६४ पैकी १५ हेक्टर (४४.५९ टक्के), सूर्यफुलाची २६.२० पैकी ९ हेक्टर (३५.३५ टक्के) पेरणी झाली आहे.
एकूण गळितधान्यांची ३ हजार ६४४ पैकी १ हजार ४१७ हेक्टरवर ३८.८८ टक्के) पेरणी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात ६०४ हेक्टरवर करडई...
हिंगोली जिल्ह्यातील करडईच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. गेल्या पाच वर्षातील सरासरी २०५.६६ च्या तुलनेत यंदा ६०४ हेक्टरवर करडईची पेरणी झाली आहे.
हिंगोली, वसमत, सेनगाव, औंढानागनाथ तालुक्यात करडईचे क्षेत्र आहे. जवसची ४ हेक्टर, तीळाची ७७ हेक्टर, सुर्यफुलाची ३५० हेक्टर पेरणी झाली.
एकूण गळीत धान्यांचे सरासरी क्षेत्र ८४२ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ हजार १३५ हेक्टरवर (१३४.७४ टक्के पेरणी झाली आहे.
तालुकानिहाय करडई पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)
तालुका - सरासरी क्षेत्र - पेरणी - क्षेत्र टक्केवारी
परभणी - १०० २५९ २५९
जिंतूर - ३९४ ७५ १९.०१
सेलू - ८७१ २२० २५.२४
मानवत - २६६ २४८ ९३.१३
पाथरी - २८४ ५४ १८.९७
सोनपेठ - २९३ ५ १.७
गंगाखेड - ७०५ २९६ ४१.९७
पालम- २७५ ९८ ३५.६१
पुर्णा - १८० २५ १३.८८
हिंगोली- ४५ ९१ २०२
कळमनुरी - ६७ ०० ००
वसमत - १० ४०१ ४०१०
औंढा नागनाथ - १७ १० ५८.८२
सेनगाव - ६६ १०२ १५४.५५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.