Kolhapur Cooperative Department agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur Cooperative Department : कोल्हापूर जिल्ह्यातील ६०० हून अधिक दूध संस्थाचा पत्ताच नाही, सहकार विभागाची कारवाई

Kolhapur Cooperative Institute : कोल्हापूर जिल्ह्यात सहकार विभागाने जिल्ह्यातील संस्थांचे सर्वेक्षण करण्याच आदेश दिले होते.

sandeep Shirguppe

Kolhapur Cooperative News : कोल्हापूर जिल्ह्यात सहकार विभागाने जिल्ह्यातील संस्थांचे सर्वेक्षण करण्याच आदेश दिले होते. या सूचनेनुसार जिल्ह्यातील संस्थांची झाडाझडती करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या वर्षभरात ६५७ दूध व ७६४ पशुसंस्थांना अवसायनात का काढू नये, अशा नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत.

दुग्ध विभागाचे सहायक निबंधक यांनी कारवाईचा धडाका बडगा उगारला असल्याने काही दूध संस्थांना कायमचे टाळे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात सहकार रुजावा या उद्देशाने मागच्या काही वर्षांत बऱ्याच सहकारी संस्था काढण्यात आल्या होत्या. दरम्यान मागच्या पाच वर्षांपासून राज्य शासनाकडून सहकार विभागातील घाण काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार सरकार विभागाकडून अनेक संस्थांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ८१० संस्था बंद, ठावठिकाणा नाही, असे निदर्शनास आले. त्यांना अंतिम नोटसा लागू केल्या आहेत. त्यानंतर झालेल्या सर्वेक्षणात ६१८ संस्थांचा ठावठिकाणाच सापडत नाही. या संस्थांनाही अवसायनात का काढू नये, अशा नोटिसा लागू करत महिन्यात म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याचबरोबर सहकार विभागाने जिल्ह्यातील दूध संस्थांच्या कारभाराबाबत तक्रारीनंतर विशेष लेखापरीक्षण अहवाल दुग्ध विभागाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये संस्थेचे आर्थिक नुकसान केल्याचे स्पष्ट होते. या ११ दूध संस्थांवर कलम ८३ नुसार कारवाई केली आहे. या चौकशीनंतर गरज भासल्याचे ८८ नुसार कारवाई होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT