Karnataka Sugar Factory : सीमाभागातील साखर कारखाने लवकर होणार सुरू? कर्नाटक सरकारच्या जोरदार हालचाली

Sugarcane Production : देशभरात कमी पाऊस झाल्याने शेतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. याचा सर्वात मोठा फटका ऊस पिकावर झाला आहे.
Karnataka Sugar Factory
Karnataka Sugar Factoryagrowon
Published on
Updated on

Belgaum Sugar Factory : देशभरात कमी पाऊस झाल्याने शेतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. याचा सर्वात मोठा फटका ऊस पिकावर झाला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी साखर उद्योगातील तज्ज्ञांनी लाखो मेट्रीक टन उसाचे उत्पादन घटण्याची भिती व्यक्त केली होती.

कर्नाटक राज्यात बऱ्यापैकी उसाचे उत्पादन घेतले जाते परंतु यंदा पावसाअभावी ऊस उत्पादन घटल्याने यंदाचा हंगाम किती महिने चालणार यावर जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान पावसाअभावी ऊस उत्पादनात घट झाल्यामुळे बेळगावसह उत्तर कर्नाटकातील साखर कारखान्यांना एक नोव्हेंबरनंतर हंगाम सुरू करण्यात यावा, असा आदेश राज्याचे व्यापार व औद्योगिक विभागाचे सचिव डॉ. रिचर्ड डिसोझा यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांना बजाविला आहे.

कर्नाटकामध्ये साखर कारखान्यांकडून (Sugar Factory) आपल्या मर्जीनुसार हंगाम सुरू करण्यात येतो. विशेषतः उत्तर कर्नाटकामध्ये हा प्रकार जादा आहे. यातून कारखान्यांकडून ऊस नेण्यासाठी स्पर्धा जाणवते. त्यामुळे अपरिपक्व ऊस गाळप होतो. परिणाम, साखर उताऱ्यासह उपपदार्थ उत्पादनावर दिसतो.

उत्तर कर्नाटकातील कारखाने लवकर सुरू झाल्यानंतर असे कारखाने अन्य कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामधील ऊस अनधिकृतपणे व बेकायदेशीररीत्या गाळप करतात. त्यातून वादविवाद व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. त्याचा विचार करून कारखान्यांनी १ ते १५ नोव्हेंबर कालावधीमध्येच हंगामाला सुरुवात करण्याबाबत आदेश आहे.

Karnataka Sugar Factory
Sugar Factory Election : सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांची रणधुमाळी होणार सुरू, कोल्हापुरात काटे की टक्कर!

कर्नाटकच्या मंत्री समितीच्या आठ जुलैला झालेल्या बैठकीत तशा सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर राज्याच्या साखर आयुक्तांनी ११ ऑगस्ट रोजी पत्र पाठवत उत्तर कर्नाटकातील कारखान्यांना तशा सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत १२ व १३ सप्टेंबरला बैठकी झाल्या आहेत. तेथे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

त्यात उत्तर कर्नाटकातील साखर कारखाने १ नोव्हेंबरपूर्वी सुरू न करणे या निर्णयाचा अंतर्भाव आहे. नियोजित तारखेपूर्वी कारखाने सुरू झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याबाबतचा उल्लेख डॉ. डिसोझा यांनी पाठविलेल्या पत्रात आहे. पावसाअभावी यंदा ऊस उत्पादन कमी झाले आहे. सर्वाधिक उसाचे उत्पादन बेळगावमध्ये घेतले जाते.

अथणी, कागवाड, कुडची, रायबाग आणि चिक्कोडी तालुक्यात जादा पीक येते. परंतु, यंदा या तालुक्यातही पावसाने ओढ दिल्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. गतवर्षी २१ नोव्हेंबर २०२२ मध्ये हंगाम सुरु झाले होते. यंदाही या दरम्यान कारखाने सुरु करण्याबाबत तयारी सुरु आहे. २०२२-२३ मध्ये बेळगाव जिल्ह्यात २७,२०० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. यंदा गेल्यावर्षीपेक्षा २० लाख मेट्रिक टन कमी ऊस उत्पादन झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे उपसंचाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाकडून एक नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याबाबत निर्देश आहेत. यामुळे दसरा, दिवाळी सण पार पडल्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू करण्यात येतील. निश्‍चित एक नोव्हेंबरपासून कारखाने सुरू होणार नाहीत. मात्र, नोव्हेंबर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com