Kolhapur Rain Forecast : पश्चिम महाराष्ट्रात उद्या पावसाचा अंदाज, खरीप पिकांना दिलासा, १३७ मिमी पावसाची नोंद

Kolhapur Radhanagari Rain : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात दाजीपूरमध्ये काही तासांत तब्बल १३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
Kolhapur Rain Forecast
Kolhapur Rain Forecastagrowon
Published on
Updated on

Rain Forecast : मागच्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी वळवाच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, ठाण्यासह इतर जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू होता. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. काल कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावून पिकांना उभारी दिली. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने चांगलीच बॅटींग केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, करवीर, गगनबावडा, गडहिंग्लज तालुक्यात काही वेळाच्या अंतराने झालेल्या पावसाने सगळीकडे पाणीचपाणी केले. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. दरम्यान राधानगरी तालुक्यातील दाजीपूरमध्ये काही तासांत तब्बल १३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात भात, भुईमूग, सोयाबीनसह फळ व पालेभाज्यांना मोठ्या पावसाची गरज होती. या पिकांवर खोड अळी, तांबेरा, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवरील रोग आणि कीड घालवण्यासाठी मुसळधार पावसाची प्रतीक्षा होती. आजच्या पावसाने काही प्रमाणात का असेना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राधानगरी तालुक्यातील दाजीपूर येथे ढगफुटीसदृश पाऊस झाला. सायंकाळी साडेचार वाजल्यापासून रात्री साडेनऊपर्यंत केवळ पाच तासांत १३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी १४०० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. धरणाचा स्वयंचलित दरवाजा खुला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. कुंभी कासारी लघु पाटबंधारे परिसरातही अतिवृष्टी झाली आहे.

Kolhapur Rain Forecast
Rain Update : जोर कमी पण हजेरी कायम; हिंगोलीतील तीन मंडळात अतिवृष्टी

कुंभी कासारीतून विसर्ग सुरू

कुंभी आणि कासारी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. कासारीतून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळी वाढण्याची शक्यता कुंभी धरण प्रशासनाने वर्तवली आहे.

उद्यापासून पावसाचा अंदाज

गुरुवारी (ता. २८) अनंत चतुर्दशी व त्यानंतर काही दिवस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला. यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फिरू शकते. मात्र, शेतीसाठी हा पाऊस दिलासादायक असणार आहे.

यामुळे राधानगरी धरण पायथ्याच्या वीजगृहातून चौदाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाणी वाढण्याची शक्यता असून, सध्या धरणाची पातळी ३४७ फूट इतकी आहे. आवक वाढल्यास स्वयंचलित दरवाजा उद्या सकाळपर्यंत खुला होऊ शकतो. दरम्यान काळम्मावाडी धरणाच्या पायथ्याला असलेल्या वीजगृहासाठीही उद्यापासून विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसे आदेश जलसंपदा विभागाला देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com