Safflower Pest Agowon
ताज्या बातम्या

Safflower Pest : करडई पिकावर मावा, हरभऱ्यावर घाटेअळी

कृषी विभागातील पाच जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झालेल्या करडई पिकावर मावा तर हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

Team Agrowon

लातूर : कृषी विभागातील पाच जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी (Sowing) झालेल्या करडई पिकावर मावा (Safflower Pest) तर हरभरा पिकावर (Chana Crop Pest) घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर आहे. प्रत्यक्षात १६ लाख ७९ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या १२३ टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे.

विभागातील पाचही जिल्ह्यांत करडई पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९५३१ हेक्टर आहे. प्रत्यक्षात २३९४८ हेक्टर क्षेत्रावर करडई पिकाची पेरणी झाली. हे पीक सध्या वाढीच्या व फुलोरा अवस्थेत आहे.

मात्र काही प्रमाणात पिकावर मावा किडीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. हरभरा पिकाचे पाच जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र ७८६१२४ हेक्टर असताना प्रत्यक्षात ११६०२९१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

हरभऱ्याचे पीक सध्या फुलोरा व घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. पाचही जिल्ह्यात घाटेअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. याशिवाय सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी पिकांवर अल्प प्रमाणात मर रोगाचा प्रादूर्भाव आढळून येत आहे. रब्बी ज्वारी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३७१८५७ हेक्टर आहे.

आतापर्यंत २९८१०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. पीक सध्या वाढीच्या ते पोटरी अवस्थेत आहे. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. गहू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १५६५१९ हेक्टर आहे. प्रत्यक्षात १५४१२१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

गव्हाचे पीक सध्या वाढीच्या, काही प्रमाणात ओंबी भरण्याच्या अवस्थेत आहे. रब्बी मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७९७१ हेक्टर आहे. प्रत्यक्षात १७७६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. हे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT