Safflower Sowing : मराठवाड्यात बावीस हजार हेक्टरवर करडई पेरणी

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा २२ हजार २१३ हेक्टरवर करडईची पेरणी झाली आहे.
Safflower Cultivation | Safflower Farming Guide | Marathwada Safflower Sowing
Safflower Cultivation | Safflower Farming Guide | Marathwada Safflower SowingAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा २२ हजार २१३ हेक्टरवर करडईची पेरणी (Safflower Sowing) झाली आहे. लातूर विभागातील पाच जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन करडईची पेरणी (Marathwada Safflower Sowing) झाली असली तरी औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यांत मात्र करडईची पेरणी अत्यल्पच आहे.

Safflower Cultivation | Safflower Farming Guide | Marathwada Safflower Sowing
Safflower Aphids : करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापन

यंदा लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत करडईचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर आहे. यंदा प्रत्यक्षात २१ हजार ७४७ हेक्टरवर करडईची पेरणी झाली आहे. झालेली पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १११ टक्के आहे. तर विभागातील करडईचे पीक सध्या उगवणी व वाढीच्या अवस्थेत आहे.

Safflower Cultivation | Safflower Farming Guide | Marathwada Safflower Sowing
Safflower Aphids : करडईवरील मावा किडीला कसं रोखता येईल?

दुसरीकडे औरंगाबाद कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत करडईचे सर्वसाधारण क्षेत्र २६३८ हेक्टर आहे. परंतु प्रत्यक्षात केवळ १७.६९ टक्के म्हणजे ४०६.८० हेक्टरवरच करडईची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या या क्षेत्रामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २० हेक्टर क्षेत्रासह जालन्यातील ९३.८० हेक्टर व बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ३५३ हेक्टर करडई क्षेत्राचा समावेश आहे.

५२ हजार हेक्टरवर रब्बी मका

औरंगाबाद जालना हे दोन जिल्हे मका पिकाचे हब मानले जातात. खरिपाप्रमाणेच रब्बीतही या जिल्ह्यांमध्ये मका पीक घेतले जाते. यंदा औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत मकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३८२४७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ३८ हजार ४६८ अर्थात शंभर टक्के मका पेरणी झाली आहे.

दुसरीकडे लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत मकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७ हजार ९७१ हेक्टर असताना प्रत्यक्षात १३ हजार ७०६ हेक्‍टरवर मकाची पेरणी झाली आहे. झालेली पेरणी ही सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७६ टक्के इतकी आहे. पाचही जिल्ह्यांतील पीक सध्या उगवणीच्या व वाढीच्या अवस्थेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com