Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Rain Update : कोकण, मराठवाड्यात कोसळधारा

Team Agrowon

Pune News : कोकण, घाटमाथ्यावर मागील चार दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी गुरुवारी (ता. २०) जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, राज्यात सर्वदूर पाऊस सुरू असल्यामुळे अनेक धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. कळमोडी, हतनूर, तुळशी अशी काही धरणे भरली आहेत. तसेच पावसाने दिलासा मिळाल्यामुळे राज्यात पेरण्या ७९ टक्क्यांवर पोहोचल्या आहेत.

शुक्रवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत पिंगुली येथे २३३ मिलिमीटर पाऊस पडला. तर त्यापाठोपाठ मानगाव येथे २२०.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. राज्यातील सर्वदूर जोरदार पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पावसाने दिलासा मिळाला असला तरी राज्यात ३०९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे विहिरीच्या आणि बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने टँकरच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तर राज्यातील धरणांमध्ये ३४.७६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ६२.७० टक्के पाणीसाठा होता.

कोकणात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस पडला. त्यामुळे कुंडलिका, जगबुडी या नद्यांनी धोक्याची पाणीपातळी ओलांडली आहे. त्यामुळे रोहा, कोलाड, गोवे, पुई, वाकण, खारगाव, धटाव, खेड शहर, अलसुरे, चिचघर, प्रभुवाडी अशी गावे बाधित झाली आहेत.

तर अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सुऱ्या या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. ज्या ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, तेथील स्थिती पूर्वपदावर येत आहे. तर दरडी कोसळणाऱ्या गावांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी प्रशासनाकडून नोटिसा काढण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांपूर्वी मध्य महाराष्ट्रात व खानदेशातील अनेक भागात कमीअधिक पाऊस पडला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या नाशिक, पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली भागांत ढगाळ वातावरण असून, अधूनमधून तुरळक सरी पडत आहेत.

आतापर्यंत झालेल्या पावसामुळे अनेक धरणांतील पाणीपातळी बऱ्यापैकी वाढली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. सोलापूर जिल्ह्यातही भीज पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यातील धरणाकडून उजनीकडे २२ हजार २४८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने उजनीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. भात पट्ट्यात लागवडी वेगाने सुरू झाल्या असून, पूर्व भागातील शेतीकामांना वेग आला असल्याने पेरण्या बऱ्यापैकी उरकल्या आहेत.

मराठवाड्यात काही भागांत जोरदार

मराठवाड्यातील बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशीव, परभणी या जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी आहे. मात्र नांदेड जिल्ह्यातील अनेक मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेती खरडून गेली आहे. जाहूर आणि दारदरवाडी येथील तलाव फुटल्याने अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहे. तर बिलोली तालुक्यातील गारणाळी, माणचूर, बिलोली, गोळेगाव, आरळी, कासराळी, बेळकोणी, कुंडलवाडी, गंजगाव येथील सुमारे एक हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

उपविभागीय, दंडाधिकारी व तहसीलदार या प्रशासनाची टीम गावागावांत फिरून मदतकार्य करत आहे. हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. आखाडा बाळापूर मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे कयाधू नदीला पूर आला आहे. हिंगोली, नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरगाव पुलाजवळील शेतामध्ये पुलामध्ये पाणी शिरल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत.

विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा रौद्ररूपात वाहत आहे. मुखेड तालुक्यातील पूरग्रस्त भागात जिल्हाधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत. तर गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण जलाशय विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून ११ हजार ६८८ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोर :

विदर्भात जोर झाला कमी झाला आहे. सर्वदूर हलक्या सरी बरसल्या. पश्‍चिम भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेत पाण्याचे भरली आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे विदर्भातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांतील पाणी पातळी हळूहळू वाढू लागली आहे. मागील चार ते पाच दिवस झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी गेल्याने पिकांचे नुकसान झाले असले, तरी आता त्यातील पाण्याची स्थिती कमी झाली आहे.

येथे पडला २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस :

अंबेरी २१२.३, सावंतवाडी २०४.८, म्हापण २०२.८, वेटोरे २००.३, वळवण २०२.८, मानगाव २२०.८, नारंगल २१०.८, आदमपूर २१३.८.

शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली ठिकाणे

पोयनाड १०६.५, चौल, रामराज १०६.५, कसू १०६.५, नाटे १२०, इंदापूर १२३, लोणेरे ११४.५, निजामपूर १०४, कोलाड १४९.३, बवरली १०६.५, तळा १०६, मेंढा १४९.३, पाचल १११, देवगड १११.५, मिथबांब ११०.८, शिरगाव ११५.३, मालवण १८५.५, पेंडूर १८५, मसुरे १४९.८, श्रावण १४८, पोयीप १४८, बांडा १८२.८, आजगाव १२५.५, आंबोली १९४.५, मदुरा १७७, वेंगुर्ला १३७, शिरोडा १३५.५,

कणकवली १३७.३, फोंडा १४०.३, नांदगाव १०९, वागडे १६२.३, कुडाळ २६८.५, कडवल १४९.५, कसाल १६९.८, वैभववाडी ११०, येडगाव १०१.८, भुईबावडा ११०, तलवट १९४.५, भेंडशी १३६, गगनबावडा ११०, गवासे ११३.५, चंदगड १०७.३ सागरोळी १२१.५, आंबुलगा १२२.८, येवती, जहूर १४१.३, हदगाव ११६, पिंपरखेड ११६.३, देगलूर १६२.३,

खानापूर १६४, मारखेल ११३.५, मालेगाव १२१.३, शहापूर १८१.५, हनेगाव ११२.५, इस्लापूर १३१.५, जालंधरा १०१.५, शिवानी ११२.५, हिमायतनगर, जावळगाव, सारसम १०५.५, लोनबेहल, आंजनखेड १२४.३, उमरखेड १०६.८, चातरी १५६.३, काढोली १११.८, सिंरोचा ११०, पेटीपाका १०५.३, आसारली १९०, पेरमिली १९०.८, देसाईगंज १२०.३, शंकरपूर १०५, विरार १०४.

राज्यात मंडलनिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - कृषी विभाग)

कोकण : नांदगाव, पडघा ८४.५, पनवेल ८९, पोयंजे ९२, ओवाले, करनाला ८९, मोबाबे ७५, कडाव ७६.८, आटोने ८२, महाड ९५, बिरवडी ९७, खारवली ९७, तुडील ९३.१, मानगाव ८५.८, गोरेगाव ९७.८, रोहा ८२, नागोठाणे ८६.३, कोडगाव ९७.३, देवळे ८१.८, देवरूख ८२.८, लांजा ८८.८, भांम्बड ९७, फुनस ८८.८, विलवडे ९७, पाटेगाव ८०.३, बापर्डे ९२, आचरा ९२, सांगवे ८५.५, वसई, मांडवी ७५.३, आगाशी ८२.३, निर्माल ७५.५ मानिकपूर ७५.३, चिंचणी ८१.५, पालघर ८१.५, बोईसर ८१.५, तारापूर ८१.५, सफाळा, आगरवाडी ६५.५.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ६१, लोणावळा ६४.५, वेल्हा ७७.८, बामनोळी ५२.३, मोरगिरी ७४.३, महाबळेश्‍वर ८६.३, तापोळा, लांजम ४८, बाजार भोगाव ५५.५, आंबा ९७.३, सालवन ६६.५, नेसरी ६४.८, पिंपळगाव ६१, कडगाव, कराडवाडी ५६.८, आजरा ७७, मालिग्रे ६४.८, उत्तर ६९, नारंगवाडी ७९, तुरकेवाडी ८३.५, हेरे ७५, मानगाव ७२.८.

मराठवाडा : जळकोट ८३, बिलोली ८४.५, कुंडलवाडी ८४.३, लोहगाव ७३.५, रामतीर्थ ७८.३, बारहाली ९६, मुक्रामाबाद ६०.८, तळणी ८२.५, मंथा ८४.५, तामसा ८३.५, आष्टी ९६.५, मोघाली ७८.८, किनी ७७.८, बोदाडी ७८.५, धर्माबाद ८५.८, झरीकोट ८४.३, सिरीजखोड ८५.८, नरसी ७३.५, आखाडा बाळापूर ९४.५, टेभुर्णी ७८.८, येहलगाव ८५.८.

विदर्भ : पूर्णानगर ७१, रिधापूर ६९, आंबाडा ८९, बेलोरे ७३.३, चांदूर ६३.५, शिरजगाव ६४, ब्राह्मणवाडा ९५.३, निगनूर ६६.८, कुपटी ८६.३, फुलसावंगी ६६.८, वढोना ६८.८, कळमेश्‍वर ६८.३, धापेवाडा ६८.३, मूल, बेम्बाळ, चिखली ७४, जांभूळघाट ६६.५, पोम्पुर्णा ७४, गडचिरोली ६६.५, पोरला ६५, ब्राह्मणी ९४, कुरखेडा ९७.५, पिसेवादथा ७३.३, आष्टी ६१.८, बामनी ९३.३, जिमलगत्ता ९१, कासानसूर ७५, धानोरा ८० चातगाव ९४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT