Vidarbh Rain Update
Vidarbh Rain Update Agrowon

Vidarbh Rain Update : विदर्भात पावसाची उघडीप

Latest Rain Update : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये बुधवारी (ता.१९) पावसाने पुरती दाणादाण उडाली होती. त्यानंतर गुरुवारी (ता.२०) मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांना काहीशी गती आली.
Published on

Nagpur News : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये बुधवारी (ता.१९) पावसाने पुरती दाणादाण उडाली होती. त्यानंतर गुरुवारी (ता.२०) मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांना काहीशी गती आली. चंद्रपूर शहरात एकाच दिवशी तब्बल २४२ मिमी पावसाची नोंद बुधवारी घेण्यात आली होती. गुरुवारी या जिल्ह्यात २ मिमी इतक्‍या अत्यल्प पावसाची नोंद करण्यात आली आहे.

गुरुवारी (ता.२०) रात्रीपासून विदर्भात पावसाने कहर केला. अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्‍यातील पिंजर मंडळात सर्वाधिक नुकसान नोंदविण्यात आले. धाकली, किनखेड, पिंपळगाव, जमकेश्‍वर ही सर्वाधिक बाधित गावे ठरली.

चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाचा फटका बसला. शहरात ढगफुटीसदृश पावसाने दाणादाण उडाली. शहरात पाण्याचा निचरा न झाल्यामुळे नागरिकांची वाहने बुडाली, तर अनेक घरात पाणी शिरले.

Vidarbh Rain Update
Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस

गुरुवारी (ता. २०) चंद्रपूर जिल्ह्यात २, तर ब्रह्मपुरी भागात ३०.८ मिमी पावसाची नोंद झाली. भंडारा जिल्ह्यात पुजारीटोला प्रकल्पाचे चार, गोसेखुर्दचे १३, धापेवाडा २३ गेट उघडण्यात आले असून त्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी (ता.२०) पावसाच्या परिणामी नदी-नाल्यांना पूर आल्याने सात मार्गांवरील वाहतूक बंद होती.

Vidarbh Rain Update
Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित

त्यामध्ये आलापल्ली-भामरागड, आलापल्ली-भामरागड-लाहेरी, सिरोंचा तहसील ते पर्सेवाडा मार्ग, पुसूकपल्ली ते जाफराबाद, अहेरी-मोयाबीनपेठा, कंबालपेठा ते जाफराबाद, अंकिसा ते चिंतरवेला या मार्गांचा समावेश आहे.

गडचिरोली जिल्ह्यात २९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. अकोला ०.९, बुलडाणा २, गोंदिया ०.६, नागपूर ३१, वर्धा ३.२, वाशीम २, यवतमाळ ३.१ मिमी याप्रमाणे पावसाची नोंद घेण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com