Summer Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Summer Bajari Sowing : सांगोल्यात शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरीकडे कल

सांगोला तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी बाजरी लागवडीचे क्षेत्र वाढत आहे.

Team Agrowon

Solapur News : सांगोला तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी बाजरी लागवडीचे (Summer Bajari Sowing) क्षेत्र वाढत आहे. कमी कालावधी आणि कमी खर्चात हे पीक निघत आहे. त्यामुळे त्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा सांगोला तालुक्यात सुमारे ६१ हेक्टरवर उन्हाळी बाजरीची लागवड (Bajari Cultivation) झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

सांगोला हा तसा कमी पर्जन्यमानाचा तालुका आहे. त्यामुळे उन्हाळ्यात सहसा या भागात पिके होत नाहीत. चारा पिकांशिवाय अन्य पिकांकडे शेतकरी फारसे वळत नाहीत. पण अलीकडच्या काही वर्षांपासून शेतकरी उन्हाळी बाजरीच्या लागवडीकडे वळले आहेत.

पुण्यामधील खेड व जुन्नर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरीची लागवड होते. बाजरी बियाण्यांचे आगार असलेल्या या भागातून अनेक शेतकऱ्यांनी बियाणे आणले आहे.

सांगोला तालुक्यातील मुख्यत्वे अकोला, महिम, महूद या गावांमध्ये बाजरीचे क्षेत्र वाढले आहे. एकट्या अकोल्यात हे क्षेत्र ४० हेक्टरवर पोचले आहे.

विशेषतः नीरा उजव्या कालव्याचे पाणी व टेंभू, म्हैसाळच्या पाण्याची आलटून-पालटून आवर्तने तालुक्यातील अनेक गावांना मिळत आहेत. त्यामुळे उन्हाळी बागायती पिकांची चांगली सोय झाली आहे. त्याचाही परिणाम बाजरीच्या क्षेत्रवाढीसाठी होत आहे.

मी गेल्या वर्षी पहिल्यांदाच बाजरीचा प्रयोग केला. त्यावेळी मला चांगले उत्पादन मिळाले. त्यामुळे मी स्वतःबाजरी पीक घेतले. तसेच गावातील शेतकऱ्यांना हे पीक घेण्याचा सल्ला दिला. माझ्या गावात बाजरीची लागवड वाढली आहे.

- विठ्ठल शिंदे, शेतकरी, अकोला (वासूद), ता. सांगोला.

यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. आम्ही बाजरी लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहोत. त्यासाठी आवश्यक बियाण्यांची उपलब्धता, तंत्रज्ञान याचीही माहिती देत आहोत. त्यामुळे क्षेत्रवाढ होत आहे. यंदा ६१ हेक्टरपेक्षाही अधिक क्षेत्रावर लागवड झाली आहे. पुढील वर्षी त्यात आणखी वाढ होईल.

- शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, सांगोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

Onion Farmers Issue: ‘बफर स्टॉक’चा कांदा शेतकऱ्यांच्या मुळावर

Sugarcane Transport Rule: ऊस वाहतुकीमध्ये बैलांना क्रूर वागवू नका; साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना

SCROLL FOR NEXT