Parbhani News : यावर्षीच्या उन्हाळी हंगामात शुक्रवार (ता. २४) पर्यंत परभणी जिल्ह्यात ६ हजार ५११ हेक्टर (५९.४२ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात ९ हजार ७०३ हेक्टर (३६.८३ टक्के) अशी दोन जिल्ह्यात मिळून १६ हजार २१४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
यंदा या दोन जिल्ह्यात भुईमुगाची ६ हजार हेक्टर आणि सोयाबीनची ७ हजार ५१९ पेरणी झाली आहे.
परभणी जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील सरासरी १० हजार ९५८ हेक्टरपैकी ६ हजार ५११ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गळीत धान्यांची ९ हजार ४८२ पैकी ५ हजार १५९ हेक्टरवर (५४.४१ टक्के) पेरणी झाली.
त्यात भुईमुगाची ६ हजार ७९६ पैकी १ हजार ७१८ हेक्टर, सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ हजार ६६२ असताना यंदा ३ हजार ४३२ हेक्टरवर, तिळाची ११.२४ पैकी ८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कडधान्यांचे सरासरी क्षेत्र ४९.०७ हेक्टर असताना ५७.९ हेक्टरवर पेरणी झाली.
त्यात मुग १०.४ हेक्टर,उडदाची ३७ हेक्टरवर पेरणी झाली. तृणधान्यांची १ हजार ४२७ पैकी १ हजार २९४ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात मका ५०९ हेक्टर,ज्वारी ७७ हेक्टर, बाजरी ७०७ हेक्टरचा समावेश आहे.
हिंगोली जिल्ह्यात सरासरी २६ हजार ३४८ पैकी ९ हजार ७०३ हेक्टरवर पेरणी झाली. गळीत धान्यांची १४ हजार ८५६ पैकी ८ हजार ९६१ हेक्टरवर पेरणी झाली.
त्यात भुईमुगाची ६ हजार ४६३ पैकी ४ हजार २८२ हेक्टर (६६.०५ टक्के), सोयाबीनची ८ हजार ३९२ पैकी ४ हजार ८७ हेक्टर (४८.७१ टक्के), सुर्यफुलाची ४६५ हेक्टर, तिळाची १२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कडधान्यांची ५ हजार ५३० पैकी ३२२ हेक्टरवर (५.८ टक्के) पेरणी झाली.
तालुकानिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) (ता.२४ मार्च पर्यंत)
तालुका - सरासरी क्षेत्र- पेरणी क्षेत्र - टक्केवारी
परभणी - ३१०० - ९६९ - ३१.२८
जिंतूर - ३९७५ - २१२५ - ५३.४५
सेलू - २८०- ३५३- १२६.०५
मानवत- ५५८ - ८७४- १५६.५३
पाथरी- ४२२ - ३८१- ९०.१४
सोनपेठ - ४५९- ५६२- १२२.३९
गंगाखेड - ५८५- १००३ - १७१.२
पालम - ३१२ - ५२- १६.६३
पूर्णा - १२६३- १९० - १५.०४
हिंगोली- २७८१- ७३३ - २६.३६
वसमत- १३२६४ - ३९२१- २९.५६
औढानागनाथ- २१२० - १६२० - ७६.४२
सेनगाव - ६१९६- ३४२९- ५५.३३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.