Agriculture Electricity  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : विस्कळीत वीजपुरवठ्यापुढे शेतकरी हतबल

रब्‍बी लागवडीला वेग आलेला असतानाच दुसरीकडे पेरणी केलेले शेतशिवार भिजवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धडपड सुरू आहे. त्याच्या या प्रयत्नांमध्ये वीजपुरवठ्याचा सर्वात मोठा अडथळा निर्माण झालेला आहे.

Team Agrowon

अकोला ः रब्‍बी लागवडीला (Rabi Sowing) वेग आलेला असतानाच दुसरीकडे पेरणी (Rabi Cultivation) केलेले शेतशिवार भिजवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धडपड सुरू आहे. त्याच्या या प्रयत्नांमध्ये वीजपुरवठ्याचा (Electricity Supply) सर्वात मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. शेतीला ठरवून दिलेल्या काळात सुद्धा सलग पुरवठा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. रब्बीच्या सुरुवातीलाच हा मोठा प्रश्‍न भेडसावत आहे.

सध्या रब्बी पेरण्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. काही भागांत गहू, हरभरा ताशीसुद्धा लागला. पेरणी केलेल्या शेताला सिंचन करण्यासाठी शेतकरी दिवसरात्र राबत आहे. आठवड्यात तीन दिवस दिवसा व उर्वरित दिवस रात्री दरम्यान वीजपुरवठ्याचे बहुतांश भागात शेड्यूल आहे. आठ तास वीजपुरवठ्याचा दावा शासन व यंत्रणा करतात.

परंतु असा सलग वीजपुरवठा शेतकऱ्यांना फारसा मिळत नसल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. एकाचवेळी विजेची मागणी वाढल्याने अनेक भागातील वीज रोहित्र नादुरुस्त होत आहेत. हे रोहित्र दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याची अट घातली जाते. थकबाकीसाठीही वीजपुरवठा देताना कर्मचारी दबाव टाकत असतात. शेतकऱ्यांची सध्या शेतीची कामे वीज शेड्यूलवर ठरत आहेत. दिवसभर राबूनसुद्धा शेतकऱ्याला रात्री पुरवठा होणार असेल, तर कडाक्याच्या थंडीत रात्र जागून काढावी लागत आहे.

आधीच खरीप हंगामात जास्त पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान केले. या नुकसानाची झळ रब्बीतून भरून काढण्यासाठी शेतकरी यंदा जोमाने कामाला लागला होता. पैशांची तजवीज करून रब्बीची लागवड केली. आता पिकाला पाणी देण्याची गरज असताना वीजपुरवठा नियमित मिळत नसल्याने त्याची परीक्षाच घेतली जात आहे.

मी १३ नोव्हेंबर रोजी हरभरा पेरला. हरभऱ्याला संरक्षित सिंचन देण्यासाठी पंप चालू केला. १४ नोव्हेंबरला विजेचा सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शेड्यूल होता. प्रत्यक्षात वीज दहा वाजता सुरू झाली आणि दोन वाजता बंद केल्या गेली. लाइनवर तीन तास फॉल्ट असल्याने काम होते. दुसऱ्या दिवशी वीजेचे शेड्यूल दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंत होते. प्रत्यक्षात वीज पुरवठा पाच वाजता सुरू झाला आणि साडेसात वाजता बंद केल्या गेला. अशा पद्धतीने एकूण आठवड्याचा मी वीज पुरवठ्याचा हिशेब ठेवला व त्याची सरासरी काढली असता शेतकऱ्यांना दररोज फक्त तीन तास वीज मिळत असल्याची वस्तुस्थिती आहे.

- रमेश निकस, शेतकरी, सावत्रा, जि. बुलडाणा

अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात माळेगाव फीडरवर सुद्धा असाच अनियमित वीजपुरवठा होतो. शेतकऱ्यांना सिंचन करताना मोठी दमछाक करावी लागत आहे.

- प्रमोद गावंडे, शेतकरी, तेल्हारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT