Dairy  Agrowon
ताज्या बातम्या

Dairy Business : पावसाने ओढ दिल्याने दुग्ध व्यवसाय धोक्यात

Dairy Industry : ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्यापही जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे वाहिले नसून पुरेसा हिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुधन धोक्यात आले आहे.

Team Agrowon

Solapur News : ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्यापही जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे वाहिले नसून पुरेसा हिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुधन धोक्यात आले आहे. दुसरीकडे दुधाचे दर कोसळलेले असल्याने दुग्ध व्यवसाय दुहेरी संकटात आहे.

जून महिन्यात ओढ दिलेला पाऊस जुलै व ऑगस्ट महिन्यातही म्हणावा तसा पडला नाही. पुरेसा पाऊस नसल्याने हिरव्या चाऱ्याचे प्रमाणही कमी आहे. यामुळे जिल्ह्यातील पशुधन वैरणीअभावी संकटात सापडले आहे.

दुधाला वाढीव दर मिळावा यामागणीसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केली आहेत. त्याची दखल घेऊन दूध दरवाढीबाबत शासनाने काढलेल्या आदेशात स्पष्ट उल्लेख नसल्याने नवा आदेश म्हणजे दूध उत्पादकांची शुद्ध फसवणूक असून त्यातून दूध संघाकडून दूध उत्पादकांची लूट सुरू आहे.

दूध उत्पादकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दूध दर निश्चितीसाठी समिती स्थापन केली. या समितीने अभ्यासाअंती अहवाल सादर केला. या समितीच्या अहवालानुसार, गाईच्या दुधाचा दर ३४ रुपये प्रतिलिटर निश्चित करण्यात आला.

त्यांची अंमलबजावणी २१ जुलैपासून सुरू झाली परंतु, दूध संघांनी पुन्हा शब्दांचे खेळ करीत शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच ठेवली आहे. या नव्या आदेशानुसार, दूध उत्पादकांचा फायदा होण्याऐवजी नुकसानच जादा होत आहे.

त्याचे कारण असे की, शासनाने ३.५/८.५ गुणप्रतीस ३४ रुपये दर असा उल्लेख सोडून दरासंबंधी अन्य कोणतेही मार्गदर्शन या आदेशात नाही. दूध दरवाढीचा आदेश संदिग्ध आहे. ३.५/८.५ गुणप्रती व्यतिरिक्त त्याखालील गुणप्रतीला किती दर द्यावा? असा कोणतीही उल्लेख नसल्यामुळे संघांनी आपापल्या पद्धतीने दरामध्ये कपात करायला सुरवात केली आहे.

यापूर्वी ३.५ फॅटच्या खालील प्रत्येक गुणप्रतीस ५० पैसे प्रमाणे कपात होती, तसेच एएनएफ ८.५ खालील प्रत्येक गुणप्रतीस ३० पैसे प्रमाणे कपात होती. नवीन आदेश आल्यानंतर या संघांनी पळवाट काढली आहे. फॅटच्या गुणप्रतीला ५० पैसे कपात तशीच ठेवली. मात्र, एसएनएफ ८.५ च्या खालील प्रत्येक गुणप्रतीला ३० पैशांऐवजी एक रुपयाने कपात करण्यात येत आहे.

म्हणजे ३.५/८.५ ला ३४ रुपये दर आहे, असे समजल्यास त्यावेळी जुन्या दरपत्रकाप्रमाणे ३.३/८.२ ला दर मिळाला असता ३२.१० रुपये पण नवीन दरपत्रकाप्रमाणे ३० रुपये दर मिळणार आहे. म्हणजे २.१० रुपये नुकसान होणार आहे. शासनाने ३.५/८.५ गुणप्रती व्यतिरिक्त त्याखालील गुणप्रतीस किती दर द्यावा, अशी मार्गदर्शक नियमावली जारी करावी, जेणेकरून दूध उत्पादकांची फसवणूक होणार नाही, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे.

वैरण महागणार

पावसाअभावी कडवळ, मका या हिरव्या चाऱ्याचे दर गगनाला भिडला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने कोणीही शेतकरी चारा विक्री करताना दिसत नाही. यामुळे दुग्ध व्यावसायिकांना हिरवी वैरण आणायची कोठून असा प्रश्न पडला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे चारा उपलब्ध आहे त्यांनी दर वाढविले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: ऑनलाइन नोंदणी झाली; पण खरेदी केंद्रे आहेत कुठे?

Farmer ID: सोलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित

Cotton Harvest: कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई

PM Kisan Yojana: 'या' राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे ९ हजार रुपये मिळणार, जाणून घ्या काय आहे योजना?

Voter List: मतदार यादीतील त्रुटींवर वाद पेटणार? ‘एकगठ्ठा’ हरकतींना निवडणूक आयोगाने घातली बंदी

SCROLL FOR NEXT