Palghar News: विक्रमगड तालुक्यातील म्हसरोली गावात पांढरा कांद्याच्या लागवडीला सुरुवात केली आहे. परतीचा पाऊस लांबल्याने, प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे चित्र आहे. .विक्रमगड तालुका शेतीतील नवनवीन प्रयोगांसाठी पालघर जिल्ह्यात केंद्रबिंदू ठरत आहे. फुलशेती, हळद, भाजीपाला, तूती, सूर्यफूल पिकांबरोबर सफेद कांद्याची लागवड शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे साधन ठरत आहे. म्हसरोलीत आठ-नऊ वर्षांपासून सफेद कांद्याची लागवड केली जाते. यंदा १३० शेतकऱ्यांनी १४० ते १५० एकरवर सफेद कांद्याची लागवड केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन येण्याची शक्यता आहे..Cash Crop Farming : नगदी पिकांची शेती आतबट्ट्याचा सौदा.सफेद कांद्याला औषधी महत्त्व आहे. सर्दी-कफावर ताजा कांद्याचा रस, मध व गूळ उपयुक्त ठरतो. मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल नियंत्रणासाठीही कांदा लाभदायक आहे. रक्ताची कमतरता, अॅनिमियावरही कांदा परिणामकारक असल्याचे जाणकार सांगतात..Cash Crop : शेतकऱ्यांना नगदी पिकांसाठी प्रोत्साहन द्या.बाजारात चांगला भावमुंबई, वसई-विरार, पालघर, नालासोपारा, भाईंदर आदी शहरी बाजारपेठांमध्ये सफेद कांद्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांऐवजी अधिक नफा देणाऱ्या या पिकाकडे शेतकरी वळले आहेत. .सेंद्रिय खत, दर्जेदार बियाणे आणि पाण्याचे योग्य नियोजनाचा वापर केला आहे. यामुळे एकरी १० ते १५ टन उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. चांगल्या प्रतीचा कांदा मिळाल्यास प्रतिमाळ १०० ते १२० रुपयांचा भाव मिळू शकतो, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.