Satara News: रब्बी हंगामात जे शेतकरी ई-पीक पाहणी ॲपमधून पिकांची नोंद करणार नाहीत, त्यांना कोणत्याही पिकांचे (पीक विमा, पीककर्ज, नैसर्गिक आपत्ती) अनुदान मिळणार नाही. तसेच सर्व कृषी शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. सद्य:स्थितीमध्ये रब्बी हंगाम पीक पाहणीची आकडेवारी बघता शेतकरी स्तरावरून यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. .शेतकरी स्तरावरून पीक पाहणीसाठी अंतिम सहा दिवस शिल्लक राहिलेले असून, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक पाहणी केली नाही त्यांनी २४ जानेवारीपर्यंत पिकांची नोंद डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल अॅपद्वारे शेतकरी लॉगीनमधून करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे..E Crop Survey: शासनाची रब्बी हंगाम ई-पीकपाहणी सुरू.जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ‘‘रब्बी हंगामी पिकांचा माहिती संच हा राज्यातील सर्व कृषक जमिनीच्या पीक पाहणीसंदर्भात १०० टक्के पीक पाहणी व शेताच्या बांधावर जाऊन फोटो काढून पीक पाहणी ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. .E Crop Survey: आता ऑफलाइन करता येणार ‘ई-पीकपाहणी’: उज्ज्वला पांगरकर.या दोन्ही बाबी पूर्ण होण्यासाठी राज्यभरात प्रत्येक गावात सहायकाची नेमणूक करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यासाठी एकल पिकासाठी १० रुपये प्रतिप्लॉट आणि मिश्र पिकांसाठी १२ रुपये प्रति प्लॉट इतके मानधन निश्चित केले आहे. .कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडील १४ ऑक्टोबरच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार तसेच जमाबंदी आयुक्त कार्यालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार ई-पीक पाहणीसाठी सहायक म्हणून कोतवाल, ग्रामरोजगार सेवक, आशा सेविका व ग्रामस्तरीय मानधनावर कार्यरत इतर विभागाचे कर्मचारी यांच्यापैकी प्रत्येक गावासाठी एका सहायकाची नियुक्ती संबंधित तालुक्याचे तहसीलदार करणार आहेत.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.