Dharashiv News: पावसाळ्यात अस्मानी संकटाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता नवीनच संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कळंब, मुरूम, उमरगा आणि धाराशिव तालुक्यांत चोरट्यांनी धुमाकूळ घालत विहिरीवरील मोटारी, स्टार्टर आणि स्प्रिंकलर पाइप लंपास केले आहेत. ऐन रब्बी हंगामात सिंचन साहित्य चोरीला चालल्याने आणि त्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने दुहेरी आर्थिक संकट शेतकऱ्यांवर येऊ लागले आहे. .चोरीप्रकरणी रविवारी (ता.१८) संबंधित पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कळंब तालुक्यातील मस्सा (खं.) येथील शेतकरी सुरेश हरिदास फरताडे यांच्या गट नं. ६७८ मधील विहिरीवरून अज्ञात चोरट्यांनी तीन एचपीचा पंप, स्टार्टर आणि शंभर फूट वायर असे एकूण २२ हजार ९७१ रुपयांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे..Agriculture Equipment Theft : कृषी साहित्यांची चोरी थांबणार कधी? शेतकऱ्यांना चिंता....पाणबुडी मोटार, वायरची चोरीधाराशिव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धेश्वर वडगाव शिवारातही चोरीची घटना घडली. विजय महादेव गुरव यांच्या गट नं. ३८६ मधील शेतातून पाच एचपीची पाणबुडी मोटार आणि ६० फूट वायर असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे..पाणी असूनही पिकांना देता येईनासाहित्याची चोरी होत असल्याने पाणी उपलब्ध असूनही पिकांना देता येईना गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. चोरीच्या या सलग घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे..Farm Equipment Theft : शेतकऱ्यांची शेतीअवजारे चोरणारी टोळी अखेर जेरबंद.मुरूममध्ये शेततळ्यातील मोटार चोरीलाउमरगा तालुक्यातील मुरूम पोलिस ठाणे हद्दीतील कंटेकुर शिवारात शरद अशोक भोसले यांनी बटईने केलेल्या शेतातून चोरट्यांनी शनिवारी (ता. १७) मध्यरात्री पाच एचपीची १० हजार रुपये किमतीची मोटार लंपास केली..जकेकुर शिवारात स्प्रिंकलर संचावर डल्लाउमरगा तालुक्यातील जकेकुर शिवारात चोरट्यांनी स्प्रिंकलर संचावर डल्ला मारला आहे. भूषण सुधाकर गायकवाड यांच्या शेतातून स्प्रिंकलरचे लोखंडी पाइप आणि नेझल असे ७ हजार ५०० रुपयांचे साहित्य चोरीला गेले. उमरगा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.