Kharif Crop Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Crop : तेल्हारा तालुक्यात कमी पावसामुळे पिके धोक्यात

Kharif Season : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यात कमी पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम सुरुवातीच्या टप्प्यातच अडचणीत सापडला आहे.

Team Agrowon

Akola News : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यात कमी पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम सुरुवातीच्या टप्प्यातच अडचणीत सापडला आहे. कपाशी पिकाला रात्री-बेरात्री पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत आहे. रानटी प्राण्यांची भीती वाढलेली आहे. कोरडवाहू पिके संकटात सापडली आहेत.

या तालुक्यात काही भागांत सिंचनाच्या सोयी असून काही भाग कोरडवाहू आहे. सिंचन सुविधा असलेले शेतकरी दरवर्षी मॉन्सूनपूर्व कपाशी पेरतात. यंदाही अशी पेरणी झालेली आहे.

परंतु पाऊस येत नसल्याने व वन्य प्राण्यांनी हैदोस घातल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. कोरडवाहू पट्ट्यातील शेतकरी जोरदार पाऊस पडण्याची प्रतीक्षा करीत आहेत. जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाला असून, पावसाअभावी व वाढलेल्या उष्णतेमुळे कोवळी पिके कोमेजून जात आहेत.

तेल्हारा तालुक्यात खरिपाचे क्षेत्रफळ ५८ हजार ५३१.३८ हेक्टर आहे. आतापर्यंत कपाशीची ६ हजार ८५२ हेक्टरवर, तर सोयाबीन २१३५ हेक्टर, तूर ११११, ज्वारीची ०८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तालुक्यात आजवर १० हजार ९८ हेक्टरवर लागवड करण्यात आली.

यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीचा पेरा वाढलेला आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरी १६१ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. यंदा फक्त ३४.८ मिलि पाऊस झाला आहे.

तेल्हारा तालुक्यात जोरदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा आहे. मात्र खरिपाची तयार पूर्ण झाली आहे. बागायती क्षेत्र वगळता कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीसाठी पुरेसा पाऊस पडू द्यावा.
- नरेंद्र राठोड, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा जि. अकोला
एक जूनला कपाशीची लागवड केली आहे. मात्र पाऊस पडत नसल्याने रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने पीक कोमेजून जात आहे.
- आकाश पालीवाल, शेतकरी, दानापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT