Rabi Season: खामगाव तालुक्यात ४० हजार हेक्टरवर यंदा रब्बीचे नियोजन
Khamgaon Agriculture: खामगाव तालुक्यात यंदाच्या रब्बी हंगामात सुमारे ४० हजार ७३० हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड होणार आहे. गतवर्षीपेक्षा क्षेत्र ५ हजार हेक्टरने वाढले असून, मुबलक जलसाठा आणि खरीपातील नुकसानीमुळे शेतकरी रब्बी पिकांकडे वळले आहेत.