Indian Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : पीक उत्पादन वाढीसाठी ‘कृषी’चे पीकनिहाय नियोजन

Latest Agriculture News : राज्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या तूर, मूग, उडीद, भात, सोयाबीन, कापसाच्या पिकांवर अधिक भर असेल.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : राज्यात खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादन वाढीसाठी गेल्यावर्षी केलेल्या कार्यवाहीमुळे फायदा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदाही खरिपातील पिकांची उत्पादन वाढ व्हावी, या साठी पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांनी काय नियोजन करावे, याविषयी कृषी विभागाने नियोजन केले आहे. राज्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या तूर, मूग, उडीद, भात, सोयाबीन, कापसाच्या पिकांवर अधिक भर असेल.

कृषी विभाग प्रामुख्याने तुरीमधील मग रोग, हेक्टरी रोपांची संख्या वाढीसाठी पेरणी नियोजन, ४५ दिवसानंतर शेंडे खुडणी, फूलकळी, फुलोरा व दाणे भरण्याच्या वेळी पाणी व्यवस्थापन, मूग व उडदामध्ये बुरशीजन्य रोगांपासून नियंत्रण, मूग, उडीद व तूर यांचे आंतरपीक, ज्वारी व मूग, कापसात मूग, उडदाचे आंतरपीक, भातामध्ये करपा, उदबत्ता, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण,

गादीवाफ्यावर भात रोपवाटिका व्यवस्थापन, चारसूत्री पद्धत, ड्रमसीडर, एसआरटी, मातीपरिक्षणानुसार खताचा वापर, खाचरात २ ते १० पाणी पातळी राखणे, खोडकिडे, तपकिरी तुडतुडे, पाने गुंडाळणारी आळी यांचे एकात्मिक व्यवस्थापन, सोयाबीनमध्ये उगवण क्षमता तपासणी,

बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी, पाने खाणारी आळी, खोडमाशी व चक्री भुंगे नियंत्रण, नत्राचा अतिरिक्त वापर नको, कापसात जमिनीनुसार वाण निवड, हलक्या जमिनीत सरळ वाणांची अतीघन लागवड, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण, स्वच्छ कापूस वेचणी, एक गाव एक वाण निवड आदी बाबींवर मार्गदर्शन करणार आहे. विस्तार विभागाने याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला कळविले आहे.

नियोजनातील प्रमुख बाबी...

- तूर, मूग, उडीद, भात, सोयाबीन, कापसाच्या सुधारित बियाण्यांचा वापर

- विविध रोगांपासून बचावाचे नियोजन

- बीजप्रक्रिया, आंतरपीक पद्धतीचा अवलंब

- मृद आरोग्यपत्रिकेनुसार रासायनिक खते व मुलद्रव्यांचा संतुलित वापर

- तण व्यवस्थापन, पर्यावरण पूरक औषधांचा वापर

- क्रॉपसॅप अंतर्गत शेतीशाळा

- संरक्षित सिंचनासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब

खरिपात त्या-त्या भागात जी प्रमुख पीक आहेत. त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीपासून काढणीपर्यंत मार्गदर्शन केले जाईल. खते, बियाणे व औषधांसह अन्य बाबींच्या वापरातून उत्पादन वाढविणे शक्य आहे.

- सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT