Agriculture Water Management
Agriculture Water ManagementAgrowon

Kharif Season : खरीप हंगामात पाण्याची मागणी वाढणार

Agriculture Water Management : यंदाच्या खरीप हंगामातील हवामानाचा अंदाज बघता सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता वाढली आहे.
Published on

Amravati News : यंदाच्या खरीप हंगामातील हवामानाचा अंदाज बघता सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता वाढली आहे. कृषी विभागाने त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातून पाण्याचे नियोजन केले असले.

तरी प्रत्यक्षात मागणी वाढण्याची शक्यता असल्याने नियोजनात वाढ करण्याची वेळ येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वेळी ११८३ हेक्टर क्षेत्र वाढ गृहीत धरून नियोजन करण्यात आले आहे.

Agriculture Water Management
Pune Rain : पुणे जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी

जिल्ह्यातील अप्पर वर्धा या मोठ्या धरणासह पाच मध्यम व सात लघू प्रकल्पातून ६० हजार ८१ हेक्टर कोरडवाहू क्षेत्रास सिंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन कृषी विभागाने या खरीप हंगामात केले आहे. खरीप हंगामात सिंचनासाठी पाण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात नाही.

मात्र गतवर्षीच्या हंगामात ५९ हजार ८९८ हेक्टर क्षेत्रास मागणी झाल्याने सिंचनासाठी पाणी देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील २२ सिंचन प्रकल्पांतर्गत १ लाख ५६ हजार ७९८ हेक्टर निर्मित सिंचनक्षेत्र आहे. त्यापैकी ८२ हजार ३८७ क्षेत्र अप्पर वर्धा प्रकल्पांतर्गत आहे. गतवर्षी ३९ हजार ३७७ हेक्टर क्षेत्रात पाण्याची मागणी झाली होती व हंगामात या क्षेत्रात सिंचनासाठी प्रत्यक्ष वापर झाला.

वासणी व गर्गा हे मध्यम प्रकल्प वगळता शहानूर, पूर्णा, सपन, चंद्रभागा आणि पंढरी प्रकल्पांतून ७४८७ हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी पाणी पाळ्या सोडण्यात आल्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com