Delhi Kisan Mahapanchayat: दिल्लीच्या जंतरमंतरवर शेतकऱ्यांची महापंचायत; हमीभाव,अमेरिकेसोबतचा करार हे मुद्दे चर्चेत
MSP Demand: दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या "किसान महापंचायती"त देशभरातील शेतकरी एकत्र आले. एमएसपीला कायदेशीर हमी, शेती-दुग्ध व्यवसायाला अमेरिकेच्या करारातून वगळणे आणि जुन्या आंदोलनातील खटले मागे घेणे या तीन प्रमुख मागण्या सरकारपुढे ठेवल्या गेल्या.