Sangli News : ज्या शेतजमिनीत महापुराचे पाणी शिरले आहे त्या सर्व शेतीचे पंचनामे करा, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. जुनेखेड (ता. वाळवा) येथे महापूरग्रस्त भागाला भेट देऊन त्या परिसराची त्यांनी पाहणी केली. या वेळी ग्रामस्थ व शेतकरी यांच्याशी त्यांनी संवाद साधला..या वेळी त्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी आबासाहेब पाटील, तालुका कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण, ॲड. चिमण डांगे, राहुल महाडिक, गौरव नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. पाटील म्हणाले, ‘‘ज्यांच्या शेतजमिनीत महापुराचे पाणी शिरले आहे, त्यांना योग्य ती मदत मिळावी. लहानमोठे पीक असा भेदभाव करू नये. .Crop Damage Compensation : तुम्हीच करा जिओ टॅगिंग अन् मागा भरपाई .महापूर हे नैसर्गिक संकट आहे. महापुराच्या तडाख्यात सापडणाऱ्या गावकऱ्यांनी भविष्यात घरे बांधताना ती दुमजली किंवा उंच बांधणे गरजेचे आहे.’’ महापूर आल्यानंतर प्रशासनाने काय उपाययोजना केल्या, याची त्यांनी माहिती घेतली. माजी उपसरपंच राहुल पाटील यांनी पूर आल्यानंतर पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी कायमस्वरूपी उपायोजना करण्यासंदर्भात मागणी केली. .यामध्ये प्रताप चौक ते जुनेखेड कमान (शिव), बिरोबा मंदिराजवळील जुनेखेड ते वाळवा रस्ता (इ.जि.मार्ग क्र. ३९) आणि भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागील जुनेखेड ते नवेखेड या रस्त्यांवरील पुलाची उंची प्राधान्याने वाढवण्याची मागणी केली. त्याचबरोबर पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान, पूरबाधित शेतीसाठी भरीव अनुदानाची मागणी केली. .Rain Crop Damage: सांगली जिल्ह्यातील सात हजार एकरांवरील पिके पाण्यात.तशा आशयाचे निवेदन मंत्री पाटील यांना दिले. सरपंच प्रियांका पाटील, अश्विनी गावडे, नितीन पाटील, हणमंत पाटील, अरुणा पाटील, नामदेव पाटील, दत्तात्रय पाटील, मोहन पाटील, सोनाली कोळगे, विमल पवार, अमोल पडळकर, सुरज चव्हाण, रवींद्र चव्हाण, गणेश पाटील, हेमंत पाटील, सतीश जाधव, विनायक जाधव, संतोष आंबी, अमोल पडळकर, अर्जुन साळुंखे, सुनील मदने, पार्थ शाह, प्रवीण देशमुख, युवराज चव्हाण, विठ्ठल गुंजवटे, विलास जाधव, जयकर चव्हाण, रवींद्र थोरात, सतीश जाधव, रवींद्र चव्हाण, धनाजी कदम, नेताजी चव्हाण, संदीप चव्हाण आदी उपस्थित होते..पंचनाम्याचे निकष काय?जुनेखेडला महापुराचा फटका अगदी सुरुवातीला बसतो. या वेळी घरात पाणी शिरलेली घरे व कुटुंबे ३६ आहेत. तर पाणी उंबऱ्याला लागले आहे, सुरक्षितता म्हणून घर सोडले आहे अशी ६१ कुटुंबे आहेत. त्यांचे पंचनामे होणार का? पंचनाम्याचे निकष काय? याबद्दल महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची माहिती नाही, असे नुकसानग्रस्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सांगितले.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.