Kharif Season : आधुनिक लागवड तंत्रातून वाढेल खरीप पिकांची उत्पादकता

Kharif Crop : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना खरीप पिकांची लागवडीबाबत तांत्रिक माहिती देण्याच्या हेतूने कृषी विज्ञान केंद्राद्वारे खरीप कृषी मेळावा व शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon
Published on
Updated on

washim News : पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना खरीप पिकांची लागवडीबाबत तांत्रिक माहिती देण्याच्या हेतूने कृषी विज्ञान केंद्राद्वारे खरीप कृषी मेळावा व शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन व स्वर्ग विकास समितीच्या सहकार्यातून कार्यक्रम घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे होते. शास्त्रज्ञ डॉ. एस. के. देशमुख, आर. एस. डवरे, टी. एस. देशमुख, डॉ. डी. एन. इंगोले, जिल्हा क्लस्टर मॅनेजर शंकर शिंदे उपस्थित होते.

Kharif Season
Kharif Seed Supply : खरिपासाठी ४५३९ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

डॉ. काळे यांनी खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना शास्त्रोक्त माहिती व निविष्ठा वेळेत उपलब्ध व्हाव्यात या हेतूने मेळावा आयोजित केल्याचे सांगून शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यावसायिक पाहावे असे स्पष्ट केले.

कृषी विस्तार तज्ज्ञ डॉ. एस. के. देशमुख यांनी सेंद्रिय शेती पद्धतीत माती परीक्षणाचे महत्त्व व मातीचा नमुना काढण्याची पद्धत याबाबत शास्त्रोक्त विवेचन केले.

कीटकशास्त्रज्ञ आर. एस. डवरे यांनी तांत्रिक सादरीकरणात जैविक शेती मिशनअंतर्गत शेतकऱ्यांनी विविध मिश्र किडींची ओळख व संवर्धन करणे, वनस्पतिजन्य कीटकनाशकाचा वापर, कीड व्यवस्थापनासाठी विविध सापळा पिके, पक्षी थांबे, कामगंध सापळे तसेच जैविक कीटकनाशकाचा वापर करून पीकसंरक्षण खर्चात कशी कपात करता येईल याचे विस्तृत विवेचन केले.

टी. एस. देशमुख यांनी सेंद्रिय शेती, पारंपरिक नैसर्गिक शेती आणि आधुनिक शेती यांची वैशिष्ट्ये याबद्दल सखोल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचा असलेला सेंद्रिय शेती संभ्रम यावर चर्चा केली. तसेच जमिनीच्या आरोग्यासाठी आरोग्यदायी पोषक धान्य व पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी परंपरागत शेती व एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा असे आव्हान केले.

डॉ. इंगोले यांनी मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करून शेतीवर होणारा अतिरिक्त खर्च कमी करावा व घरचे बियाणे, जैविक खते यांचा वापर करून खर्च कमी करावा, असे आवाहन केले. प्रक्षेत्र व्यवस्थापक पी. व्ही. देशमुख व गृह विज्ञानतज्ज्ञ शुभांगी वाटाणे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास केनवड, अंचळ, नेतंसा, वडजी, पिंप्री सरहद, करडा गावांतील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय मांडवगडे, तर आभार महादेव माळेकर यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com