Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : जळगावात अतिवृष्टीने अडीच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Heavy Rain Update : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील आठ तालुके बाधित झाले असून, तब्बल अडीच हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यातून व्यक्त होत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात आठ व नऊ आणि पंधरा ते सतरा सप्टेंबर या पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील आठ तालुके बाधित झाले असून, तब्बल अडीच हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यातून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातुर होते. सप्टेंबरमध्ये मात्र वरुणराजाची पुन्हा कृपा झाली. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पाचोरा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, धरणगाव, जामनेर, चोपडा, जळगाव या आठ तालुक्यांत पाच दिवसांत अतिवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

केळी पीक अक्षरश: झोपले

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका केळी पिकाला बसला आहे. यासोबतच ज्वारी, तूर, सोयाबीन, भाजीपाला, मका आणि कापूस पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती प्राथमिक अहवालातून समोर आली आहे.

पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश

जिल्ह्यातील आठ तालुक्यांत झालेल्या नुकसानीची पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी माहिती घेतली असून, या भागातील शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT