Crop Damage : पावसाच्या लहरीपणाने शेत शिवारातील चिंता वाढली

Rain Update : पावसाचा लहरीपणा मराठवाड्यातील खरीप पिकांच्या मुळावर उठला आहे. आजवर पाच ते सहा खंड पावसाचे पडले.
Drought
DroughtAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar News : पावसाचा लहरीपणा मराठवाड्यातील खरीप पिकांच्या मुळावर उठला आहे. आजवर पाच ते सहा खंड पावसाचे पडले. सर्वाधिक पेरणी झालेल्या सोयाबीनवर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

ते पीक बहुतांशी हातच गेलं, पुढचं रब्बीच काय ही चिंता लागली आहे. मात्र उत्पादनासाठी पोषक नसलेल्या पावसाने खरिपाचे झालेलं नुकसान विमा कंपन्या गृहीत धरणार की नाही याचीही चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे.

मराठवाड्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ लाख ५७ हजार हेक्टर इतके आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४८ लाख २३ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती.

Drought
Nashik Drought : सिन्नरच्या दुष्काळ स्थितीची आदित्य ठाकरेंकडून पाहणी

यंदाच्या खरीप हंगामात जवळपास ४८ लाख हेक्टरवर पेरणी झाली. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ५३.२७ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. दुसरीकडे कपाशीचा टक्का सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २८.७१ टक्के इतका आहे.

Drought
Drought Condition : महाराष्ट्रावर पाणी संकट; कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

तुरीचा टक्का ७.४२ टक्के, मकाचा टक्का ४.८१ टक्के, उडीदचा टक्का २.०९, मुगाचा टक्का सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १.४३ टक्के, बाजरीचा टक्का १.३१ टक्के, इतर पिकांचा टक्का सर्वात कमी म्हणजे ०.९७ टक्के इतकाच आहे.

म्हणजे साधारणपणे ५३ टक्के शेतकऱ्यांचा अर्थकारण सोयाबीनवर अवलंबून आहे. हे पीकच बहुतांशी हातचे गेल्याने शेतकऱ्यांचा अर्थकारण कोलमडणार हे स्पष्ट आहे. दुसरीकडे कपाशीची वाढ ही झाली नसून अनेक भागात पात, फुल, बोंड यांचा अभाव आहे.

अजूनही पाऊस हुलकावणीच देत असल्याने काही भागातील शेतकऱ्यांनी पीक सोडून दिली आहे. काहींनी सोयाबीनवर रोटा मारणे पसंत केले असून आता पाऊस आला तर उपयोगाचा नाही. आठही जिल्ह्यातील ८१ लाख ५ हजार २३५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

या शेतकऱ्यांनी ४६ लाख ४२ हजार १४६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केल्याचे पुढे आले आहे. कुठ लागू तर कुठे नाही या विमा विषयक प्रश्नांवरून आवाज उठविला जात असताना अधिसूचने पलीकडे मदतीचा गाडा सरकत नसल्याची स्थिती आहे.

दोन एकराला कसे बस पाणी देऊ शकलो त्यात थोडं फार उत्पादन होईल चार एकर सोयाबीन मात्र गेल्यात जमा आहे. दीड महिना झाला पाऊसच नाही.
- गणेश सांगळे, अकोला, निकळक, जि.जालना
ना कपाशीची वाढ झाली ना उसाची प्रदीर्घ खंडानंतर नुसता भूर भूर पाऊस. दहा-बारा कांड्या पुढे ऊस वाटला नाही. कपाशी वाढली नाही, शिवाय तिला ना पाते फुलं ना बोंडी अवघड स्थिती.
- शिवाजी देवकर, निमगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड
हलक्या, मध्यम जमिनीवरचीच नाही तर पाणी देऊ न शकलेल्या भारी जमिनीवरच सोयाबीन पण हातचे गेले. उपशावरच्या विहिरीच्या आधारे पाणी देऊन पाऊस येईल या आशेने शेतकरी प्रयत्न करतात पण सारे अवघड झालेय.
- प्रवीण राऊत, पोहरेगाव, ता. रेणापूर, जि. लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com