Maharashtra Rain Update : राज्यात सर्वत्र पावसाचे पुनरागमन

Latest Rain Update : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागांत पावसाचे पुर्नरागमन झाले आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अनेक भागांत पावसाचे पुर्नरागमन झाले आहे. शुक्रवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधील जानेफळ येथे १६२.० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. दमदार झालेल्या पावसाने कपाशी, तूर, भात पिकांना काहीशी नवसंजीवनी मिळाली असून पिके तरारली आहेत.

पावसाचे जवळपास साडेतीन महिने होऊन गेले आहे. मागील दीड महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. मागील दोन दिवसांपासून कोकणातील ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सांगली मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाने चांगलीच हजेरी लावली.

नाशिकमध्ये जुलै महिन्याच्या अखेरपासून जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झालेला नाही. त्यामध्ये सिन्नरसारख्या तालुक्यात जवळपास ४० गावांमध्ये खरिपाचा पेरा नाही. तर जुलैमधील पावसाच्या ओलीवर झालेल्या पेरण्या फक्त नावापुरत्या शेतात उभ्या होत्या. अशा परिस्थितीत खरीप पूर्णपणे हातातून गेला. तर आता पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

अशा परिस्थितीत सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा हजेरी लागल्याने शेतकरी काहीसा सुखावला. सोलापूर जिल्ह्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी (ता. २१) सायंकाळी वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

प्रामुख्याने माळशिरस, पंढरपूर, सांगोला, माढा, करमाळा तालुक्यांत पाऊस बऱ्यापैकी झाला. तर मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यांत पावसाने तुरळक हजेरी लावली. या पावसात मांडवे (ता. माळशिरस) येथे वीज पडल्याने एक महिला ठार झाली. पुणे जिल्ह्यातही पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

Rain Update
Khandesh Rain Update : खानदेशात हलका ते मध्यम पाऊस

खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू झाली आहे. ६ ते ८ सप्टेंबर दरम्यानच्या पावसात बोंडांचे अल्प नुकसान झाले. परंतु या आठवड्यातील पावसाने नुकसान वाढत आहे. बोंडे ओली होऊन त्यात आर्द्रता वाढत आहे. दर्जा घसरत असून, त्याचे दर खरेदीदारांनी जुन्या किंवा मागील हंगामातील कापसाच्या तुलनेत कमी निश्‍चित केले आहेत. नगर जिल्ह्यात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस बरसू लागला आहे.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, नांदेड या पाच जिल्ह्यांतील ३९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या २८ मंडळांपैकी ८ मंडळांमध्ये १०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला.

धो-धो पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. ओढे, नाले, नद्यांना पूर आले. या पावसाचा खरिपातील वाळलेल्या पिकांना फायदा होणार नाही. परंतु रब्बीच्या पेरणीसाठी उपयोग होऊ शकेल. पश्‍चिम विदर्भात सर्वदूर पावसाचे पुनरागमन झाले आहे. बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. वाशीम जिल्ह्यातही सर्वत्र पाऊस झाला आहे. शुक्रवारी (ता. २२) सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले होते. पूर्व विदर्भातही पावसाने चांगलीच हजेरी लावली.

कोकणात गेले दोन दिवस जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. गुरुवारी (ता. २१) सायंकाळी त्यामध्ये आणखीनच वाढ झाली. जवळपास सर्वच जिल्ह्याच्या बहुतांश भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. दडी मारलेल्या पावसाने ऐन गणेशोत्सवात जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी विजांच्या गडगडाटांसह पावसाच्या सरी झाल्या. दरम्यान, शुक्रवारी (ता. २२) पहाटेपासूनच जिल्ह्यात पावसाचे वातावरण होते. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती.

Rain Update
Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात हलक्या सरी

शंभर मिलिमीटर पाऊस पडलेली ठिकाणे :

देवरुख, तुळसानी १११.८, आंदरसूल १४०.५, आंगणगाव १०६.८, कोळगाव ११४.८, नेवासा बुद्रूक ११५.८, गंगापूर १०६.८, भेंडाळा १०७.५, सिद्धनाथ ११५.५, जामगाव १०३.५, बोरसर १०२.८, करंजखेड १०९, रावणवाडी १२२.८,चंद्रपूर १५०, पडोली ११७.८, वरूड १२१.८.

शुक्रवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात मंडळनिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : (स्रोत ः कृषी विभाग)

कोकण : धसइ, नयाहडी ७७, अलिबाग ६७.३, पोयनाड ५१.८, सरल, चौल ७३, पेण ७५, कामरली ७२.५, बिरवडी ६५.५, नाटे ८९.८, इंदापूर ३९, चानेरा ६९.८, मुरूड, नंदगाव ४८.३, बवरली ७३, श्रीवर्धन, वालवटी ६७.५, बोरलीपंचटण ४८.३, म्हसला, खामगाव ३५, खेर्डी ४२.५, कळकवणे ९४.५, शिरगांव ६६.५, धामणंद ४२.५, रत्नागिरी ३९.०, खेडशी ४९, कडवी ५१, फुंणगुस ४३.८, कोंडगाव ४५.३, देवळे ४२.३, सावंतवाडी ६८.५, कणकवली ४५, फोंडा ५०.८, कडावल ४१, माणगाव ५१.३.

मध्य महाराष्ट्र : जातेगाव ४६, उंबरठाणा ४२, सुरगाणा ४२.३, इगतपुरी ४९.५, धारगाव ५४.३, शहा ५६, येवला ७७.८, नगरसूल ७५.८, सावरगाव ६५.३, रायपूर ५३, धुळे शहर ८३.८, शिरूड ३८.८, फागणे ९०, मुकटी ८७.३, यावल ४५.८, अडावद ८८.५, गोरगावले ४९.५, चोपडा ६६.५, बहादरपूर ६८.३, बहाळ ६६.३, फत्तेपूर ५०, तोंडापूर ७६.३, नगरदेवळा, गाळण ४४.३, कजगाव ५२.५, साळवा ४८.३, बोदवड ४५.८, नांदगाव ५७, नागापूर ५१, जेऊर ५३, टाकळी ६५.८, श्रीगोंदा ६८.३, मांडवगण ४६.५, बेलवंडी ७१.८, मिरजगाव ६५.८, नान्नज ४७.८, नायगाव ४८, शेवगाव ७८.३, भातकुडगाव ८८.५, बोधेगाव ७५, चापडगाव ७६, ढोरजळगाव ४५.३, एरंडगाव ७०, टाकळी मानूर ५२.३, कोरडगाव ६५.३, मिरी ७४.५, नेवासा खुर्द ६५.८, सलाबतपूर, कुकाणा ८८.५, कोपरगाव ७६.३, रवांदे, सुरेगाव ४६.५, दहिगाव ४७.५, पुणतांबा ५५.८, वेल्हा, निमगाव सावा, बेल्हा ६५.५, डिंगोरे ५०, आंबेगाव ५१.५, शिरूर ९८.३, निमगाव ५७.५, बार्शी ८१.३, अर्जुननगर ६५.५, सोनंद ५३, उमदी ५१.

मराठवाडा :

उस्मानपुरा ६८, कांचनवाडी ५२.३, चिखलठाण ६८.३, पंढरपूर ४८, पैठण ५७.८, मांजरी ८७.८, शेंदूरवाडा ६८.५, तुर्काबाद, वाळूज ४६.३, हर्सूल ५१.८, लोणी ८१.८, लासूरगाव ६९, महालगाव ६७, नागमठाण ६९.३, लाडगाव ६८.५, कन्नड ६६, नागद ५२.५, सिल्लोड, भराडी ६७.३, गोळेगाव ५३.५, अजिंठा ७६.३, आमठाणा ६५.३, बोरगाव ८१.५, आंभाई ७९, पळोद ७०.८, शिवना ६७, बाबारान ५१.३, पिंपळगाव ५१.३, राजूर ६६.५, बीड ५३.८, राजूरी ५३.८, थेरळा ६६.३, आष्टी ६६.०, कडा ६५.३, अंबाजोगाई ६८.३, लोखंडी ६८.३, केज ५७.३, हनुमंत ४१, होळ ५१.५, विडा ५२.३, नांदूरघाट ५८.५, धाराशिव ग्रामीण ५३, सोनारी ६९, आंभी ५३.५, लेत ५४, शेवडी ५६.५, किनवट ५२, बोधडी ६७.८, सिंदगी ७९.

विदर्भ : जळगाव ८७, चिखली ७३.५, कोलारा ७५.३, धोडप ५४.३, पाडळी ९५, साखळी ४९.३, देऊळघाट ९५, जानेफळ ५०, शेलगाव ५४, लोणी ६६.८, अंजनी, नायगाव ८८.५, कल्याणा ७५.३, वाझर ७९, शेगाव ८४.५, मलकापूर, धरणगाव ७२.३, रोहिनखेड ६६.५, शेळापूर ५३, अकोला ५०.८, घुसर ६५.५,कपाशी ५६.३, बोरगाव ६६.३, पळसो ६७.५, सांगलुद ६५.५, कुरनखेड ६७, मूर्तिजापूर ६६.३, शेलू ८४, लाखपूरी, जामठी ६५, धनज ५२.५, वाडळी ५६.५, बडनेरा ५१.८, दाभा ५४.५, लोणी ५४.५, माहुली ५७.३, चांदूर ६६.८, तिवसा ५५.८, वरखेड ९७.८, शेंदुर्जना ७४.८, भेंनोडा ६६.८, वाठोदा ६५.५, थिलोरी ६५, चिंचोली ६६, दत्तपूर ५६, कोळंबी ८७.८, कुंभा ९०.५, वाढोणा ६६.५, वडकी ५२.५, खारंगणा ५४.३, कन्नमवरग्राम ५४.३, बोरी, टकलघाट ५०, रामटेक ७९, काटोल ९८.८, येनवा ५४.५, नरखेड, मोवाड ५५.५, सावरगाव ५२.८, बिशनूर ५५.५, केंद्री ७७, कामठा ५५, घुगस ७०, मूल ५४.८, नेरी, गांभूळघाट, मासाळ ६५.३, विरूर ७७.८, येनापूर ८१.८, अहेरी ६७, पेरमिली ८२, कासंसूर ५३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com