Kharif Seaosn Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Season : वाशीम जिल्ह्यात पीकस्थिती समाधानकारक

Kharif Sowing : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची संपूर्ण पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची संपूर्ण पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ७५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. आतापर्यंत अपेक्षित ४१० मिलिमीटरच्या तुलनेत ४३० मिमी पाऊस झालेला आहे.

मागील काही दिवसांत पावसाचा जोर ओसरला असून, काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत असल्याने पिकांना त्याचा फायदा होत आहे. या हंगामात जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीनलाच पसंती दिली आहे. जिल्ह्यात या हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे. मध्यंतरी काही मंडलात अतिवृष्टी झालेली आहे.

तेथे नुकसान झालेले आहे. उर्वरित भागात मात्र पिके जोमाने वाढीवर लागली आहेत. सोयाबीनसह तूर, काही प्रमाणात कपाशी, मूग, उडदाची पेरणी झालेली आहे. प्रामुख्याने सोयाबीनचे पीक सर्वदूर असून या पिकात विविध प्रकारची कामे करण्यासाठी शेतकरी व्यग्र आहेत.

जिल्ह्यात आजवर झालेला पाऊस

या मोसमात जून, जुलै या दोन महिन्यांत ४३० मिलिमीटर पाऊस झालेला आहे. या काळात ४१० मिलिमीटर पाऊस अपेक्षित राहतो. त्या तुलनेत अधिक पाऊस झाला. वाशीम तालुक्यात तुलनेने या दोन महिन्यांत पाऊस कमी झालेला आहे. ४६३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना ३५३ (७६.४ टक्के) पडला. रिसोडमध्येही ४०४ च्या तुलनेत ३६५ (९०.४ टक्के) नोंद आहे.

उर्वरित तालुक्यात मालेगावमध्ये ४१७ च्या तुलनेत ४६४ (१११ टक्के), मंगरूळपीर ३६५ च्या तुलनेत ५१५ (१४० टक्के), मानोरा ३७३ च्या तुलनेत ४२७ (११४ टक्के) आणि कारंजा ४०६ च्या तुलनेत ४७७ (११७ टक्के) पाऊस झाला.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवात अत्यंत हलक्या स्वरूपातील पावसाने झालेली आहे. अद्याप १० मिलिमीटरपर्यंतही बहुतांश तालुक्यात या महिन्यातील तीन दिवसांत पाऊस नोंद पोहोचलेली नाही.

जिल्ह्यात बहुतांश भागात पीकपरिस्थिती आतापर्यंत समाधानकारक आहे. शेतकरी आंतरमशागत, खतमात्रा, फवारणीच्या कामात गुंतले आहेत. नुकतीच मालेगाव तालुक्यात भेट देऊन पिकांची पाहणी केली असता तेथे सोयाबीन व इतरही पिके अतिशय समाधानकारक असल्याचे बघायला मिळाले.
- संजय चाटरमल, उपविभागीय कृषी अधिकारी, वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT