Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Kharif Season 2023 : शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा

Kharif Crop : निम्मा पावसाळा संपला तरी देखील अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. नदी-नाले कोरडेठाक असून विहीर-बोअरवेलची पाणीपातळी घटलेलीच आहे.

Beed News : निम्मा पावसाळा संपला तरी देखील अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. नदी-नाले कोरडेठाक असून विहीर-बोअरवेलची पाणीपातळी घटलेलीच आहे. रिमझिम पावसावरच तग धरलेल्या खरीप पिकांवर शेतकरी थोडाफार आनंदी असला तरी, पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास गोदावरी नदी आणि उजवा कालवा शिवारातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागू शकते.

सलग तीन वर्षे पाणीच पाणी करणारा पाऊस यंदा चांगलाच रुसलेला आहे. पावसाचे चार नक्षत्र गेले तरी अजूनही जातेगाव परिसरासह गेवराई तालुक्यातील बहुतांश महसूल मंडळात दमदार पाऊस झालेला नाही. प्रारंभीचे दोन नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्राच्या प्रारंभीच झालेल्या रिमझिम पावसावर शेतकरी पेरते झाले.

१ लाख ३५ हजार हेक्टरवर यंदा देखील पेरणी होईल असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र,पाऊस समाधानकारक झाला नसल्याने फक्त ९९ हजार २९६ हेक्टरवर खरिपाची गेवराई तालुक्यात पेरणी झाली आहे. यात प्रामुख्याने ८३ हजार ७२० हेक्टरवर सर्वाधिक

Kharif Season
Kharif Sowing : राज्यातील पेरण्या अंतिम टप्प्यात

कापूस लागवड झालेली आहे. विशेष म्हणजे गतवर्षापेक्षा जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा वाढलेला आहे. मूग, उडीद, बाजरी, ज्वारी, भुईमूग या पिकांचा पेरा घटलेला आहे.

सोयाबीनपेक्षा तुरीला यंदाच्या खरिपात दुय्यम स्थान शेतकऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, पेरणी होऊन एक महिन्याचा कालावधी लोटत आलेला आहे. निम्मा पावसाळा संपला आहे. तरी दमदार पाऊस झालेला नसल्याने नदी-नाले खळखळून वाहिले नाहीत. पर्यायाने विहीर, बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही.

Kharif Season
Kharif Crop Loan : सिंधुदुर्गात खरिपासाठी २०२ कोटींचे कर्ज वितरण

जायकवाडी धरणाकडे नजर

गेवराई तालुक्यातील जातेगाव, धोंडराई, उमापुर आणि तलवाडा या चार जिल्हा परिषदेच्या सर्कलमधील शेतजमिनी जायकवाडीच्या उजव्या कालव्याने सिंचनाखाली आल्या. सलग तीन वर्षे जायकवाडी धरण प्रारंभीच शंभर टक्के भरत गेले.

यंदा मात्र, हे धरण मृत साठ्यात असल्याने धरण भरल्यास उजवा कालव्यात पाणी आवर्तन येणार. यामुळे उजवा कालवा आणि गोदावरी नदीच्या काठावरील शेतकऱ्यांच्या नजरा जायकवाडी धरण भरण्याकडे लागलेल्या आहेत.

मंडळनिहाय झालेली पेरणी (हेक्टर)

मंडळ मागील वर्ष यंदा

गेवराई ९,६४२ ७,४१५

उमापूर ११,१५८ ७,४२७

रेवकी ८,५५६ ५,१६६

सिरसदेवी ८,५६२ १०,६१४

मादळमोही १४,३७६ ६,९५५

पाचेगाव ८,३०८ ७,०९८

जातेगाव १०,२८९ ६,१३८

तलवाडा १४,४०८ ९,०२३

चकलांबा ८,८६० ७,४६०

पाडळसिंगी ८,५११ ७,०९३

कोळगाव ११,०५३ ९,०८३

माटेगाव १०,१५८ ९,१६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com