Kharif Season : आभाळमाया रुसली; पिके ऊन धरू लागली

Monsoon Rain : यंदाचा खरीप हंगाम फक्त नावापुरता उरला आहे. जून महिन्यानंतर झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात टप्प्याटप्प्याने पेरण्या पूर्ण केल्या.
kharif Crop
kharif CropAgrowon

Nashik News : यंदाचा खरीप हंगाम फक्त नावापुरता उरला आहे. जून महिन्यानंतर झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात टप्प्याटप्प्याने पेरण्या पूर्ण केल्या. समाधानकारक पाऊस नसतानाही जिल्ह्यात सर्वाधिक पेरा येवला तालुक्यात झाला. मात्र आता पाऊस नसल्याने पिकांचा व पाण्याचा प्रश्न याच तालुक्यात गंभीर झाला आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात पिके फक्त नावालाच उभी आहेत. आभाळमाया रुसल्याने पिके आता ऊन धरू लागल्याने ती कोमेजण्याच्या अवस्थेत आहेत. जुलै महिना संपूनही समाधानकारक पाऊस नाही, विहिरी आता कोरड्या झाल्या आहेत. पिकांना आणि सोबत माणसांना आणि जनावरांनाही पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. ‘आमचं पीक वाळत नाही आणि वाढतही नाही’ असे शेतकरी सांगत आहेत.

kharif Crop
Kharif Season : खरिपात तूर, मुग, सोयाबीन बियाणे बदलाचे प्रमाण कमी

जिल्ह्यात अनेक भागात मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्राने दिलासा दिला. शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केली आणि जवळपास पेरण्यांचा टप्पा गाठला. जमीन ओली झाली आणि त्याच ओलीवर शेतकऱ्यांनी वाफसा होताच पेरण्या केल्या.

परिणामी तालुक्यात पेरणीचे सरासरी क्षेत्र ७०,१३५.२ हेक्टर इतके असताना ७४,०४२.८ हेक्टरवर पेरा झाला आहे. त्यामुळे ही आकडेवारी १०५.७ टक्के इतकी आहे. मात्र आता पिके पाणी पाणी करत आहेत. अधूनमधून होणाऱ्या सरींवर ती कशीबशी उभी आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक मका, मूग पेरण्या येवला तालुक्यात आहे.

kharif Crop
Kharif Season : मजुरी वाढली अन् बियाणे महागले

या गावात पिण्याचे टँकर सुरू

आहेरवाडी, जायदरे, रेंडाळे, चांदगाव, ममदापूर, खरवंडी, देवदरी, वसंतनगर, अनकाई, गोरखनगर, अनकाई, सायगाव नगरसुल, लहीत, हडप सावरगाव, पांजरवाडी, पिंपळखुटे बु. भुलेगाव, कासारखेडे, कोळगाव,वाईबोथी, कोळम खु. कोळम बु., आडसुरेगाव, गारखेडे, सोमठाण जोश, रहाडी वाघाळे, खामगाव, रहाडी, वाघाळे, खामगाव, नगरसुल नगरसुल, वडगाव, चिचोंडी बु., चिचोंडी खु., राजापूर, देवठाण.

ही आहे परिस्थिती

पाऊस नसल्याने पिकाची वाढ खुंटली

खते खरेदी करून अनेकांच्या घरातच पडलेली.

कांदा रोपवाटीका तयार करतांना पाण्याचा प्रश्न

विहरींची भूजल पातळी दिवसेंदिवस कमी

तुषार सिंचनाने पिके जागवण्याची वेळ

उपसा वाढल्याने विहिरी कोरड्या होत आहेत.

भर पावसाळ्यात गावांमध्ये डोक्यावर हांडे

येवला तालुक्यात ३४ गावे व १५ वाड्यांवर टँकर अद्यापही सुरू

ज्यांच्याकडे शेततळे आहे,त्या थोड्याफार पाण्यावर शेतकऱ्यांनी कांद्याची रोपे टाकली आहे.पण प्रमाण अतिशय नगण्य आहे. शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
- सदुभाऊ शेळके, प्रगतिशील शेतकरी, मानोरी, ता. येवला
पावसाळ्याचे दिवसात आजही टँकर सुरू आहेत. या दिवसात पाण्याची बंधारे भरून वाहतात. पावसाने पाठ फिरवल्याने आता पिके फक्त नावापुरती जीव धरून उभी आहेत. भविष्यात उत्पादनावर परिणाम होणार आहे.
- देविदास गुडघे, शेतकरी, ममदापूर, ता. येवला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com