Chana Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Chana Sowing : राज्यात यंदा हरभरा क्षेत्रात यंदा मोठी वाढ

राज्यात यंदा रब्बी पेरणीच्या काळात परतीचा पाऊस असल्याने वेळेतपेरणी झाली नाही. त्याचा परिणाम ज्वारीचे क्षेत्र घटण्यावर झाला आणि हरभऱ्याचे क्षेत्र यंदा बऱ्यापैकी वाढले आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर ः राज्यात यंदा रब्बी पेरणीच्या (rabi Sowing) काळात परतीचा पाऊस असल्याने वेळेतपेरणी झाली नाही. त्याचा परिणाम ज्वारीचे क्षेत्र घटण्यावर झाला आणि हरभऱ्याचे क्षेत्र (Chana Acreage) यंदा बऱ्यापैकी वाढले आहे.

यंदा आतापर्यंत सुमारे २७ लाख ६४ हजार २६४ हेक्टरवर पेरणी (Chana Sowing) झाली आहे. राज्यात गतवर्षीपेक्षा यंदा हरभऱ्याचे क्षेत्र एक लाख सत्तर हजार हेक्टरने तर सरासरीपेक्षा सुमारे सहा लाख पाच हजार हेक्टरने वाढले आहे.

Chana राज्यात रब्बीचे ५४ लाख २९ हजार १०१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा रब्बीची पेरणी सरासरीच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत ५७ लाख ५४ हजार ३०९ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या १०६.३६ टक्के पेरणी झालीय.

मागीलवर्षी रब्बीची आतापर्यंत ५४ लाख १४ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा गेल्यावर्षीपेक्षा यंदा रब्बीचा २ लाख ९० हजार हेक्टरने रब्बीत पेरा वाढला आहे.

रब्बीत ज्वारीनंतर सर्वाधिक क्षेत्र हरभऱ्याचे असते. गेल्या काही वर्षापासून ज्वारीचे क्षेत्र झपाट्याने घटत आहे. यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमी पेरणी झालीय. त्यात यंदा रब्बी पेरणीच्या काळात परतीचा जोरदार पाऊस सुरु होता.

त्यामुळे रब्बीमधील ज्वारी पेरणीला उशीर झाला. त्याचाही ज्वारीचे क्षेत्र घटण्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे यंदा केंद्र सरकार पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करत आहे. ज्वारी घटली तरी त्यामुळे राज्यात हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचे दिसत आहे.

हरभऱ्याचे राज्यात सरासरी २१ लाख ५८ हजार २७० हेक्टर क्षेत्र आहे. मात्र मागील पाच वर्षाचा विचार करता राज्यात हरभरा क्षेत्र वाढत आहे.

हरभऱ्याची डिसेंबरपर्यंत पेरणी होत असते. त्यामुळे आता हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता नाही. कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत हरभऱ्याची राज्यात २७ लाख ६४ हजार २६४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

गेल्यावर्षी २५ लाख ९९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्यावर्षीपेक्षा यंदा एक लाख सत्तर हजार हेक्टरने तर सरासरीपेक्षा सुमारे पावने सहा लाख पाच हजार हेक्टरने वाढले असून यंदाची सरासरीच्या तुलनेतील पेरणीची टक्केवारी १३१.१३ आहे.

राज्यात हरभऱ्याची सर्वाधिक विदर्भ, मराठवाड्यात पेरणी झालीय. त्यातही बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, नागपूर, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलडाणा, नांदेड, परभणी, हिंगोली, नगर जिल्ह्यात हरभऱ्यांचा पेरा अधिक आहे. राज्यातील चोवीस जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पेरणी झालीय. राज्यात यंदा सर्वाधिक हरभऱ्याचे क्षेत्र बुलडाणा जिल्ह्यात आहे.

राज्यातील वर्षनिहाय पेरणीक्षेत्र (हेक्टर)

१६-१७ ः १९ लाख २९ हजार

१७-१८ ः २२ लाख ३४ हजार

१८-१९ ः १६ लाख ९४ हजार

१९-२० ः २० लाख ४३ हजार

२०-२१ ः २२ लाख ३१ हजार

२१-२२ः २५ लाख ९९ हजार

२२-२३ ः २८ लाख ३० हजार २५०

जिल्हानिहाय यंदाची हरभरा पेरणी (हेक्टर)

ठाणे ः २८५३, पालघर ः २७३२, रायगड ः ९८६, रत्नागिरी ः २१, नाशिक ः ३१,०२५, धुळे ः २६,०१८, नंदुरबार ः १९,१०५, जळगाव ः ७४,७६७, नगर ः ८७,२८५ पुणे ः २२,१५२, सोलापूर ः ८९,५३०, सातारा ः ३३,५४४, सांगली ः २०,२९५, कोल्हापूर ः ४,७२३, औरंगाबाद ः ४७ हजार ०४६, जालना ः एक लाख १०१, बीड ः १ लाख ६८ हजार ७६०, लातूर ः ३९, ३१९, उस्मानाबाद ः २ लाख ४३ हजार ८४१, नांदेड ः २ लाख ५६ हजार ३२०, परभणी ः१ लाख ७९ हजार ६८९, हिंगोली ः १ लाख २६ हजार ९९४, बुलडाणा ः२ लाख ४ हजार ५४३, अकोला ः एक लाख ७ हजार ६९५, वाशीम ः ७६,८००, अमरावती ः १ लाख ३६ हजार ६९५, यवतमाळ ः १ लाख ३९ हजार ९००, वर्धा ः ७४,६५२, नागपूर ः ९४,२४२, भंडारा ः १७,३६७, गोंदिया ः ६,३१५, चंद्रपूर ः ५३,९६५, गडचिरोली ः ४९५४

मी गेल्या दहा वर्षापासून हरभऱ्याचे पीक घेतो. हरभरा पिके कमी पाण्यात, कोरडवाहू भागात चांगल्या प्रकारे येते. बाजारात दरही चांगला मिळतो इतर पिकाच्या तुलनेत हरभरा हे पीक परवडणारे आहे.

- रामदास अडसुरे, हरभरा उत्पादक शेतकरी, निमगाव घाणा, ता. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT