Team Agrowon
हरभरा पिकास साधारणतः २५ सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते. हरभरा पिकास जास्त पाणी दिल्यामुळे मूळ सडून पीक उत्पादनात घट येण्याची शक्यता असते.
हरभरा पिकास पाणी देताना जमिनीचा मगदूर पाहून पाण्याचे नियोजन करावे.
हरभरा हे मुख्यत्वे कोरडवाहू पिकामध्ये मोडते. थंडीचा कालावधी या पिकास अतिशय पोषक असतो.
पिकांच्या अवस्थेनुसार हरभरा पिकास जास्तीत जास्त तीनच पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
पिकास तुषार संचाद्वारे पाणी देत असताना पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
जमिनीत नेहमी वापसा परिस्थिती राहिल्यास पिकाची वाढ चांगली होते. फुलांवर येण्यापूर्वी, फुलावर आल्यानंतर व घाट्यामध्ये दाणे भरण्याचे अवस्थेत पाणी द्यावे.