Kabuli Chana Market : काबुली हरभऱ्याचे दर का नरमले?

देशातील बाजारात सध्या मागील हंगामातील काबुली हरभरा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र पुढील महिनाभरात देशातील नवा काबुली हरभरा बाजारात दाखल होईल. वाढलेल्या दरात मागणी कमी झाल्यानं दरही काहीसे नरमले आहेत.
Kabuli Chana Market Rate
Kabuli Chana Market RateAgrowon
Published on
Updated on

देशातील बाजारात सध्या मागील हंगामातील काबुली हरभरा (Kabuli Chana) खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

मात्र पुढील महिनाभरात देशातील नवा काबुली हरभरा (New Chana) बाजारात दाखल होईल. वाढलेल्या दरात मागणी कमी झाल्यानं दरही काहीसे नरमले आहेत.

मग यंदाच्या हंगामात काबुली हरभऱ्याला काय दर (Chana Rate) मिळू शकतो? सध्या काबुली हरभऱ्याला काय दर मिळतो आहे? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

Kabuli Chana Market Rate
Kabuli Chana Market: काबुली हरभरा दर तेजीत

1. कापूस दर कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ उतार सुरुच आहेत. आज दुपारपर्यंत बाजारात दर काहीसे नरमले होते. कापसाचे वायदे ८६.३३ सेंट प्रतिपाऊंडवर होते.

तर देशातील कापूस बाजार आजही सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांवर कायम होता. देशातील बाजारात कापसाचे दर वाढीची अपेक्षा असताना बाजार मात्र कायम आहे.

पण कापूस दरात पुढील आठवडाभरात वाढू दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Kabuli Chana Market Rate
Kabuli Chana Rate : काबुली हरभरा तेजीतच राहणार

2. सोयाबीन भावात चढ-उतार

देशातील बाजारात सोयाबीन दरात क्विंटलमागं १०० रुपयांचे चढ-उतार दिसत आहेत. मात्र सरासरी दरपातळी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान कायम होती.

आजही प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी दरात कपात केली होती.

तिकडं आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडचे दर काहीसे नरमले होते. सोयाबीन दरवाढीसाठी घटक अनुकूल असतानाही दरात कपात होत असल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत.

पण बाजारातील अभ्यासक दरवाढीची शक्यता वर्तवित आहेत. 

Kabuli Chana Market Rate
Cotton Market: देशातील बाजारात कापूस दर का नरमले? | Agrowon | ॲग्रोवन

3. आल्याचे बाजार दबावातच

राज्यातील बाजारात सध्या आल्याची आवक सरासरीएवढी होत आहे. पण तरीही आल्याचे दर दबावातच आहेत.

मागील दोन वर्षांपासून आल्याला भाव नसल्यानं उत्पादक अडचणीत आले आहेत. सध्या बाजारात आल्याला प्रतिक्विंटल ३ हजार ५०० ते ५ हजार रुपये दर मिळतोय.

आवक वाढल्यानंतर दरावरील दबाव कायम राहण्याचा अंदाज आहे, असं बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितलं. 

4. गव्हाची दरवाढ कायम

देशातील बाजारात सध्या गव्हाचे दर तेजीत आहेत. त्यामुळं राज्यातील बाजारातही गव्हाची दरवाढ कायम आहे.

राज्यातील मोठ्या बाजार समित्यांमधील गव्हाची आवक सरासरीपेक्षा कमी होत आहे. त्यामुळ दर वाढले आहेत.

सध्या राज्यातील बाजारात गव्हाला सरासरी ३ हजार ते ३ हजार ३०० रुपये दर मिळतोय. नवा माल बाजारात येईपर्यंत गव्हाचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.   

5. काबुली हरभऱ्याच्या दरात काहीशी नरमाई

राज्यात यंदा काबुली हरभरा लागवड वाढल्याचं शेतकरी सांगत आहेत. मागील वर्षभर देशी हरभरा दबावात होता. मात्र काबुली हरभऱ्याचे भाव तेजीतच होते.

मागील काही दिवसांपासून हरभरा दर कमाल भावापासून काहीसे नरमले आहेत. देशातील उत्पादन हाती येण्याची शक्यता आणि निर्यातीसाठी कमी मागणी, यामुळं दर काहीसे कमी झाले आहेत. परंतु तरीही सध्याचे दर सरासरीपेक्षा जास्तच आहेत.

देशातील काबुली हरभरा पुढील महिनाभरात बाजारात दाखल होऊ शकतो. यंदा लागवड चांगली असल्याचं सांगितलं जातं. तर भारतीय काबुली हरभरा आंतरराष्ट्रीय बाजारात काहीसा महाग पडत होता. त्यामुळं वाढलेल्या दरात निर्यातीसाठी मागणी घटली होती.

काबुली हरभऱ्याचा भाव १४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचला होता. पण आता दर काहीसे नरमले आहेत. आज काबुली हरभऱ्याला देशातील बाजारात प्रतिक्विंटल ११ हजार ते १३ हजार रुपये दर मिळाला. पुढील काळात देशात काबुली हरभऱ्याची आवक वाढेल.

पण भाव जास्त दबावात येण्याची शक्यता नाही. देशात मागील हंगामातील काबुली हरभरा नगण्य शिल्लक आहे. तसंच किमान दरात मागणी येते.

त्यामुळं काबुली हरभरा दर १० हजार रुपयांपेक्षा कमी होतील, असं वाटत नाही, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com