apmc election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election : अमरावती बाजार समिती निवडणुकीचा बिगूल

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे.

Team Agrowon

Amravati News कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीच्या निवडणुकीचा (APCM election) कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. २८ एप्रिलला मतदान होणार असून तीन दिवसांत निकाल जाहीर होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहे.

जिल्ह्यातील बारा बाजार समितीच्या अंतिम मतदार यादी २० मार्चला जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सहकार क्षेत्रातील धुरीणांचे लक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाकडे लागले होते. ती प्रतीक्षा आता संपली आहे. राज्य सहकारी प्राधिकरणाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २७ मार्चपासून प्रक्रिया प्रारंभ होणार आहे.

२७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत इच्छुकांना निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. ६ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून, अंतिम उमेदवारांची यादी २१ एप्रिलला जाहीर करण्यात येणार आहे.

यापूर्वी निवडणूक प्रक्रिया २३ डिसेंबर २०२२ पासून प्रारंभ होणार होती. मात्र त्या निवडणुकीत जुन्याच मतदारांची नावे असल्याने नव्याने निवडून आलेल्या कृषी पतसंस्था, सेवा सहकारी व ग्रामपंचायतीचे नव्याने निवडून आलेले सदस्य मतदानापासून वंचित राहणार होते. या विरोधात उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर व औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाल्या होत्या.

यावर निर्णय देताना हायकोर्टाने १ सप्टेंबर २०२२ नंतर निवडून आलेल्या सदस्यांना मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आदेश देत कार्यक्रम पुढे ढकलण्याचे व ३० एप्रिलपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. अमरावती जिल्ह्यातील अमरावती, अचलपूर, दर्यापूर, धारणी, मोर्शी, वरूड, चांदूर बाजार, चांदूररेल्वे, धामणगावरेल्वे, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व अंजनगावसुर्जी या समितीच्या संचालक मंडळाची मुदत दोन वर्षांपूर्वीच १३ ऑक्टोबर २०२० ला संपुष्टात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’विरोधात ‘चक्का जाम’

Sugarcane Productivity : ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ’ अभियानास कोल्हापुरात प्रारंभ

Agriculture Irrigation : गतवर्षीच्या तुलनेत सिंचनासाठी १६ टीएमसीने उपसा कमी

SCROLL FOR NEXT