Election
ElectionAgrowon

Akola APMC Election : बाजार समित्यांमध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मतदान

राज्यात विविध कारणांमुळे बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रखडत गेली होती. अनेक बाजार समित्यांवर प्रशासक नेमून कारभार सुरू होता.

Akola Election News : राज्यात ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये निवडणूक (APMC Election) प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. बाजार समित्यांमध्ये मतदानासाठी (APMC Election Voting) २८ किंवा ३० एप्रिल अशा तारखाही जाहीर केल्या आहेत.

बहुप्रतीक्षित असलेली ही निवडणूक जाहीर झाल्याने सहकार क्षेत्रातील घडामोडी आता पुढील महिनाभर वाढणार आहेत.

राज्यात विविध कारणांमुळे बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया (APMC Election Process) रखडत गेली होती. अनेक बाजार समित्यांवर प्रशासक नेमून कारभार सुरू होता.

आता बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार याद्यांत सुधारणा होऊन सुधारित अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत किंवा झालेल्या आहेत अशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया होत आहे. २७ मार्चपासून यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली जात आहे.

 Election
Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यातील १४ बाजार समितीचे बिगूल

जिल्हा तथा तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक घेण्यासाठी २८ किंवा ३० एप्रिल यापैकी कुठलीही एक तारीख यंत्रणांच्या सोयीसाठी देण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरू न करण्याबाबत न्यायालयाचे विशिष्ट बाजार समितीसंदर्भात आदेश असल्यास अशा बाजार समित्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू करू नये असेही आदेश देण्यात आले आहेत.

अकोला जिल्ह्यात पुढील महिन्यात अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी अशा बाजार समित्यांमध्ये निवडणूक होणार आहे.

अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा या बाजार समित्यांमध्ये जोरदार घमासान बघायला मिळू शकते. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, चिखली, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, बुलडाणा येथे निवडणूक होणार आहे.

 Election
APMC Election : सांगली जिल्ह्यातील सात बाजार समित्यांचे लवकरच बिगुल

परिशिष्ट १ नुसार निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे - २७ मार्च

नामनिर्देशन करण्याचा शेवटचा दिवस- ३ एप्रिल २०२३

नामनिर्देशन पत्रांची छाननी - ५ एप्रिल २०२३

वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्धी- ६ एप्रिल २०२३

उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक- ६ एप्रिल ते २० एप्रिल

उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी- २१ एप्रिल

मतदान- २८ एप्रिल २०२३

मतमोजणी - मतदानापासून तीन दिवसांच्या आत

परिशिष्ट २ नुसार निवडणूक कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे - २७ मार्च

नामनिर्देशन करण्याचा शेवटचा दिवस - ३ एप्रिल २०२३

नामनिर्देशन पत्रांची छाननी - ५ एप्रिल २०२३

वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्धी- ६ एप्रिल २०२३

उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक - ६ एप्रिल ते २० एप्रिल

उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी - २१ एप्रिल

मतदान- ३० एप्रिल २०२३

मतमोजणी - ३० एप्रिल २०२३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com