APMC Election : नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीसाठी अधिकारी नियुक्त

राज्यातील २८६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होत आहे. सहकार प्राधिकरणाने निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे.
apmc election
apmc electionAgrowon

Nashik APMC Election : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, २८ व ३० एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया (APMC Voting) राबविली जाणार आहे.

पहिल्या टप्यात २८ एप्रिलला नाशिकसह पिंपळगाव बसवंत, घोटी, येवला, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, नांदगाव या बाजार समित्यांसाठी मतदान होईल.

त्यांची मतमोजणी २९ एप्रिलला होईल. तर दुसऱ्या टप्प्यात लासलगाव आणि मनमाड बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

सहकार प्रधिकरणाने दिलेल्या आदेशान्वये होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिंबधक डॉ. सतीश खरे यांनी दिली.

apmc election
Nashik ZP : नाशिक जिल्हा परिषदेला मार्च अखेर ९० कोटी खर्चाचे आवाहन

राज्यातील २८६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होत आहे. सहकार प्राधिकरणाने निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचाही समावेश आहे. दोन टप्प्यांत मतदान होणार असले तरी सर्व बाजार समित्यांसाठी एकाचवेळी २७ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे.

apmc election
Akola APMC Election : बाजार समित्यांमध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मतदान

अर्ज दाखल करण्याची मुदत ३ एप्रिलपर्यंत असून, ५ एप्रिलला छाननी व त्यानंतर ६ एप्रिलला रोजी उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. अर्ज माघारीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत असेल.

त्यामुळे उमेदवारांची अंतिम यादी २१ एप्रिलला प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप होईल. जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी २८ एप्रिलला तर दोन बाजार समित्यांसाठी ३० एप्रिलला मतदान होईल.

निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती

बाजार समिती निवडणूक अधिकारी सहायक

नाशिक नितीन मुंडावरे महेश भंडागे

मालेगाव चंद्रकांत विघ्ने स्वप्नील मोरे

नांदगाव प्रताप पाडवी भाऊसाहेब आहिरे

मनमाड एस. जे. मोरे रवींद्र जाधव

येवला प्रमोद हिले विजय बोरस्ते

लासलगाव शरद घोरपडे मंगेश वैष्णव

पिंपळगाव बसवंत डॉ. अर्चना पठारे सविता शेळके

सिन्नर अर्चना सौंदाणे संजय गायकवाड

चांदवड प्रदीप पाटील अनिल पाटील

कळवण चिंतामण भोये हेमंत बिऱ्हाडे

दिंडोरी रणजीत पाटील अरुण ढोमसे

देवळा सुजय पोटे शरद दराडे

घोटी प्रेरणा शिवदास अशोक काकड

सुरगाणा कांतिलाल गायकवाड सुजीत गायकवाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com