Agriculture Technology Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Technology : शेतीला तंत्रज्ञान, पूरक व्यवसायाची जोड द्या

Latest Agriculture News : पिकांची उत्पादकता व त्याआधारे उत्पन्न वाढविण्यासाठी तंत्रज्ञानासोबतच पूरक व्यवसायाची जोड असली पाहिजे.

Team Agrowon

Gondia News : पिकांची उत्पादकता व त्याआधारे उत्पन्न वाढविण्यासाठी तंत्रज्ञानासोबतच पूरक व्यवसायाची जोड असली पाहिजे. यालाच प्रोत्साहन देण्यासाठी कृषी डॉ. पंजाबराव देखमुख कृषी विद्यापीठाकडून (पंदेकृवि) विदर्भातील ११ गावांमध्ये दत्तक ग्राम उपक्रम राबविला जात असल्याची माहिती कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी दिली.

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने गोंदिया तालुक्‍यातील किंडगीपार या गावाची विद्यापीठ दत्तक गावासाठी निवड करण्यात आली आहे. या गावात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, प्रकल्प संचालक आत्मा अजित अडसुळे, कृषी उपसंचालक सुरेश कन्नाके, केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सय्यद शाकीर अली प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. गडाख म्हणाले, ‘‘विदर्भातील कमी लोकसंख्येच्या आणि कमी उत्पन्न तसेच प्रक्रिया उद्योगांचा अभाव असलेल्या गावांची दत्तक गावांसाठी मुख्यत्त्वे निवड करण्यात आली आहे. तीन वर्षांत या गावातील शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान त्यासोबतच इतर विभागाच्या योजनांचा प्रसार केला जाईल.

प्रक्रिया तसेच शेतीपूरक व्यवसायांना देखील प्रोत्साहन देत त्या आधारे तीन वर्षांत अशा गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे नियोजन आहे. ’’ अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासन शासकीय यंत्रणा सदैव किंडगीपार ग्रामस्थांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. डॉ. उंदिरवाडे यांनी संकल्पनेमागचा उद्देश कथन केला. डॉ. अली यांनी प्रास्तावीक, तर विजय कोरे यांनी सूत्रसंचालन केले.

गणेश खेडीकर यांनी आभार मानले. यावेळी नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अविनाश लाड, महिला आर्थिक विकास मंडळाचे समन्वय अधिकारी संजय संगेकर, जिल्हा पशुधन विकास अधिकारी कांतिलाल पटले, कृषी अधिकारी पवन मेश्राम, सरपंच लीला उईके, पोलिस पाटील फनिशा सराटे, प्रयोगशील शेतकरी महेंद्र ठाकूर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT