Team Agrowon
महागाईला ब्रेक लावण्यासाठी भारत आता नेपाळमधून टोमॅटो निर्यात करण्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितले.
टोमॅटोची खेप प्रथम उत्तर प्रदेशातील वाराणसी, लखनौ आणि कानपूरमध्ये आयात केली आहे.
टोमॅटो निर्यात करण्याच्या बदल्यात नेपाळनेही भारतातून तांदूळ आणि साखर पाठवण्याची मागणी केली आहे.
भारत सरकारने नुकतीच बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, त्यामुळे नेपाळमध्ये तांदळाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली होती
टोमॅटोप्रमाणेच डाळींच्या किमंतीही महागल्या आहेत. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये तूर डाळ 140 ते 160 रुपये किलोने विकली जात आहे.
त्यासाठी भारत सरकार आफ्रिकन देश मोझांबिकशी बोलणी करत आहे. डाळींच्या आयातीबाबत करार झाला असल्याचे बोलले जात आहे.
डाळींच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने 3 मार्च 2023 पासून तूर डाळींवरील 10 टक्के आयात शुल्क हटवले आहे.
मोझांबिक 31 मार्च 2024 पर्यंत कोणत्याही अटी आणि निर्बंधांशिवाय भारतात तूर आणि उडीद डाळ आयात करेल.