Sustainable Farming: विस्कळीत शेती व्यवस्थेला हवी ‘शाश्‍वत’ नजर

Smart Agriculture: हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या शेतीसमोर नाना संकटे उभी आहेत. त्यावर मात करण्यासाठी शेतीला आता कोरडवाहू, बागायती, रासायनिक किंवा सेंद्रिय अशा विशिष्ट नजरेतून न बघता ‘शाश्‍वत शेती’ या संकल्पनेभोवती धोरण आखणी करावी लागेल.
Sustainable Farming
Sustainable FarmingAgrowon
Published on
Updated on

Pune News: हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या शेतीसमोर नाना संकटे उभी आहेत. त्यावर मात करण्यासाठी शेतीला आता कोरडवाहू, बागायती, रासायनिक किंवा सेंद्रिय अशा विशिष्ट नजरेतून न बघता ‘शाश्‍वत शेती’ या संकल्पनेभोवती धोरण आखणी करावी लागेल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

राज्याची जवळपास निम्मी लोकसंख्या रोजगारासाठी शेती व पूरक उद्योगावर अवलंबून आहे. अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचा वाटा सुमारे १३ टक्के आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी योजनानिहाय उपलब्ध भांडवली गुंतवणूक तीन हजार कोटी रुपयांच्या पुढे जात नाही. यातून राज्यकर्ते, धोरणकर्ते शेतीकडे किती दुर्लक्ष करतात, ही बाब स्पष्ट होते.

हवामान बदल, मजूर टंचाई, बेभरवशाचे बाजारभाव अशा संकटांमुळे सर्व गटांतील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळेच शेतीमधील शाश्‍वत तत्त्वांचा शोध प्रयोगशील शेतकरी आपापल्या पातळीवर घेऊ लागले आहेत. शेती कोणत्याही प्रकारची असली, तरी ती हमखास उत्पन्न देणारी आणि पर्यावरणपूरक हवी, हाच शाश्‍वत शेतीचा गाभा आहे, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे.

Sustainable Farming
Sustainable Farming: ग्रामीण तरुणांच्या रोजगारासाठी स्वतंत्र धोरण हवे

‘कोरडवाहू शेतीच्या समस्या सोडवल्याशिवाय शाश्‍वत शेतीची संकल्पना प्रत्यक्षात उतरणार नाही,’ असे मत महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनच्या शाश्‍वत विकास मिशनचे सल्लागार डॉ. सतीश कारंडे यांनी व्यक्त केले. ‘कोरडवाहू शेतीचा विकास करण्यासाठी एकात्मिक शेतीचे प्रारूप विकसित करावे लागेल. तसेच विशेष कृषी क्षेत्र निर्माण करून ग्रामीण भागात तालुकाकेंद्रित बिगर शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचे जाळे तयार करावे लागेल,’ असे ते म्हणाले.

‘शाश्‍वत विकासासाठी पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोन ही त्रिसूत्री आवश्यक आहे,’ असे पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी सांगितले. रासायनिक खतांचे अनुदान बंद करावे व जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढिण्यावर भर दिला पाहिजे,’ असे ते म्हणाले.

नाशिक येथील ‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी, ‘राज्यात प्रत्येक पिकाची इंडस्ट्री उभी करावी लागेल,’ असे मत मांडले आहे. ‘शेतीमालाची मूल्यसाखळी उभी करून त्यातून शेतकऱ्यांना सन्मानजनक व शाश्‍वत उत्पन्न मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे,’ असे ते म्हणाले.

Sustainable Farming
Sustainable Farming: शाश्‍वत शेती हीच पुढची दिशा

‘धरामित्र’ स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक डॉ. तारक काटे यांच्या म्हणण्यानुसार, शाश्‍वत शेतीमध्ये विज्ञानावर आधारित तंत्र व पारंपरिक पद्धतीची सांगड घालावी लागणार आहे. शाश्‍वत शेतीत बागायती, जिरायती, जोडधंदे, थोडी पारंपरिक व थोडी आधुनिक अशा साऱ्या पद्धतींची सरमिसळ करीत एकात्मिक शेती पद्धतीने स्वीकारावी लागेल, असे ते म्हणतात.

राज्यातील प्रयोगशील शेतकरी शाश्‍वत शेतीमध्ये पर्यावरण, परिसंस्थेला (इकोसिस्टिम) खूप महत्त्व देत आहेत. ‘प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या भागातील हवामान, पर्यावरण, जमिनीची परिस्थिती, पीक पद्धती, बाजारपेठेची मागणी याचा अभ्यास करीत नियोजन करावे,’ असे मत सेंद्रिय कृषिभूषण शेतकरी राजेंद्र भट यांनी मांडले. ‘झाडे, पाणी, पशुधन, नैसर्गिक निविष्ठा यावर सूक्ष्म अभ्यास करताना मी शेतातील जीवजंतूंनाच प्राध्यापक मानले,’ असे यवतमाळ येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा सांगतात. श्री. शर्मा यांनी त्यांच्या १५ एकर जमिनीत विकसित केलेले नैसर्गिक शेतीचे मॉडेल आदर्शवत आहे.

‘सर्वप्रथम शेतीमधील सूक्ष्मजीवांना जाणा. त्यांना वाढविण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवा. त्यासाठी शून्य मशागतीकडे जा. तणांचे निर्मूलन नव्हे तर व्यवस्थापन करा,’ असा सोपा मूलमंत्र कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांनी दिला आहे. लोहारा (जि. जळगाव) येथील प्रयोगशील शेतकरी विश्‍वास पाटील म्हणाले, की निसर्गाशी एकरूप होत शेतकऱ्याने जमीन, पाणी, बियाणे, खते आणि पीक संरक्षण या पाच मुद्द्यांवर काम केल्यास शाश्‍वत शेती शक्य होते.

शेतीचा नव्याने विचार करण्याची गरज : हातेकर

‘हवामान बदलामुळे शेतीचा नव्याने विचार करण्याची गरज आहे. कमी पाण्यात होऊ शकणारी शेती करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) पाणी व इतर निविष्ठांचा काटेकोर वापर करणे शक्य आहे. पीकपद्धतीत बदल करावा लागेल. कमी पाण्यात येणारी, दुष्काळी वातावरणात टिकणारी, उष्मा सहन करू शकणाऱ्या पिकांचे नवीन वाण विकसित करावे लागतील,’ असे मत अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर यांनी मांडले. कार्बन उत्सर्जनाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी कार्बन कर लावावा लागेल, असे त्यांचे मत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com