India US trade deal: अमेरिकेच्या व्यापार करारामुळे भारतातील दूध उत्पादकांना धोका; एसबीआयच्या अहवालात इशारा

SBI Report : एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालानुसार, व्यापारी करारांतर्गत दुग्ध क्षेत्र अमेरिकेसाठी खुलं केलं तर भारतातील दुधाच्या किंमती १५ टक्क्यांनी कमी होऊन शेतकऱ्यांना वार्षिक १.०३ लाख कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. तसेच दुधाच्या आयातीत २.५ कोटी टनांची वाढ होऊ शकते.
India US trade deal
India US trade dealAgrowon
Published on
Updated on

US Trade In India : अमेरिकसोबत व्यापारी करारांतर्गत कृषी आणि दुग्ध क्षेत्र खुली केली तर दूध उत्पादनातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना धोका निर्माण होईल, असा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सोमवारी (ता.१४) दिला आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारातून कृषी आणि दुग्ध क्षेत्र वगळण्यात आल्याची बातमी आली होती. परंतु त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब अद्याप झालं नाही.

एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालानुसार, व्यापारी करारांतर्गत दुग्ध क्षेत्र अमेरिकेसाठी खुलं केलं तर भारतातील दुधाच्या किंमती १५ टक्क्यांनी कमी होऊन शेतकऱ्यांना वार्षिक १.०३ लाख कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. तसेच दुधाच्या आयातीत २.५ कोटी टनांची वाढ होऊ शकते, असेही या अहवालात म्हंटले.

India US trade deal
RBI Report : 'कृषी'चं भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा; आरबीआयच्या अहवालात उघड

या अहवालानुसार "जर देशांतील दुधाच्या किमतीत १५ टक्के घट गृहीत धरली. तर एकूण महसूलात १.८ लाख कोटी रुपयांचा तोटा होईल. शेतकऱ्यांचा वाटा ६० टक्के गृहीत धरून किमतीतील घसरणीमुळे पुरवठा विस्कळीत झाला तर शेतकऱ्यांचे वार्षिक १.०३ लाख कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे एकूण मूल्यवर्धित रक्कम (जीव्हीए) ५० टक्के किंवा ०.५१ लाख कोटी रुपयांपर्यंत तोटात जाईल, अशी शक्यता एसबीआयने व्यक्त केली आहे.

तसेच दुधाच्या १५ टक्के किंमतीमधील घटीमुळे दुधाची मागणी १४ दशलक्ष टनांनी वाढेल. परंतु पुरवठ्यात मात्र ११ दशलक्ष टनांनी घट होईल. त्यामुळे सुमारे २५ दशलक्ष टनांची तुट आयातीतून भरून काढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यताही या अहवालात वर्तवली.

एसबीआयने अहवालामध्ये जेनेटिकल मॉडीफिकेशन (जीएम) संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेतील दुग्धजन्य पदार्थांमध्ये वाढ संप्रेरक आणि अनुवांशिकरित्या सुधारित जीवांचा वापर केला जातो. त्यामुळे क्षेत्र खुली केली तर भारतात जीएम पदार्थांचा ओघ वाढेल. त्यामुळे आरोग्य मानकांचा प्रश्न उपस्थित होईल, असेही एसबीआयचे मत आहे.

India US trade deal
Banana Export: आखाती देशातील युद्धविरामाने केळी निर्यात सुरू

भारत अमेरिकेला रसायानांची निर्यात वाढवू शकतो. सध्या जपान, मलेशिया, दक्षिण कोरियावर अमेरिका टॅरिफमुळे जास्त शुल्क आकरत आहे. त्यामुळे भारताला या करारांतर्गत रसायनांच्या निर्यातीसाठी अमेरिकेत संधी आहे. भारत १ टक्के रसायनाची निर्यात वाढवू शकतो. त्यामुळे ०.१ टक्के राष्ट्रीय सकल उत्पनात भर पडेल, असेही एसबीयाने म्हटले आहे. तसेच भारतातून अमेरिकेत कापड, सेंद्रिय अन्न, मसाले निर्यातीसह आयटी आणि सेवा क्षेत्राला संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com