India-US Trade Deal: ‘जीएम’ शेतीमाल घ्या, हमीभाव बंद करा

Bilateral Trade Agreements: भारत-अमेरिका द्वीपक्षीय व्यापार करार चर्चेत अमेरिकेने भारतावर जीएम पिकांसाठी बाजारपेठ खुली करण्यास आणि हमीभाव बंद करण्यास दबाव टाकला आहे.
GM Crop Imports
GM Crop ImportsAgrowon
Published on
Updated on

Pune News: अमेरिका आणि भारत यांच्यात सध्या द्वीपक्षीय व्यापार करारविषयक चर्चा सुरू आहे. यात भारताने आयात शुल्क कपात करण्यासह आयातविषयक नियमांत बदल करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव वाढविण्यात आला आहे. तसेच गहू आणि भातासारख्या पिकांच्या हमीभावाला विरोध, जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या आयातीला परवानगी द्या, तसेच आयात शुल्कात कपात करण्याची मागणी अमेरिकेकडून करण्यात आली आहे.

भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयात कर वाढवून अमेरिकेने भारताला वाटाघाटीसाठी दबाव आणला आहे. सध्या अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या द्वीपक्षीय व्यापार करारातून काही चिंताजनक बाबी समोर आल्या आहेत. आयात शुल्क आणि आयात नियमात शिथिलता आणण्याची अमेरिकेने भारताकडे मागणी केली आहे. भारताने ‘जीएम’ पिकांसह इतर काही वस्तूंच्या आयातीबाबत नियमावली तयार केली आहे. हे नियमही शिथिल करावेत, अशी मागणी अमेरिकेने प्रस्तावित व्यापार करारात केली आहे, असे ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटीव्ह’ने (जीटीआरआय) म्हटले आहे.

GM Crop Imports
US-India Trade Deal : अमेरिकेची भारतातील शेती क्षेत्रावर वक्रदृष्टी

‘जीटीआरआय’ने अमेरिकेच्या काही मागण्यांविषयी माहिती दिली. यामध्ये भारताने डेअरी उत्पादनांच्या आयातीसाठी ‘जीएम’मुक्त खाद्य प्रमाणपत्राची सक्ती केली असल्यामुळे अमेरिकेतून डेअरी उत्पादनांच्या निर्यातीवर बंधने येत आहेत. भारतात धार्मिक कारणांमुळे गाईच्या शरीरातील स्निग्ध घटकांपासून तयार केलेल्या बटर आयातीवर बंधने आहेत. तसेच पशू अवशेषांपासून निर्मित पशुखाद्य आयातीवरही भारतात बंधने आहेत, ही बंधने काढण्यात यावीत, अशीही मागणी अमेरिकेने केली आहे. मात्र भारताला हा मुद्दा व्दीपक्षीय करार चर्चेमध्ये समाविष्ट करायचा नाही.

हमीभाव बंद करण्याची मागणी

भारतामध्ये खरीप आणि रब्बी पिकांसाठी हमीभाव जाहीर केला जातो. मात्र हमीभावाने भात आणि गव्हाचीच मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. अमेरिकेने गहू आणि भाताच्या हमीभाव खरेदीला विरोध केला आहे. भारताने या पिकांचा हमीभाव बंद करावा, अशी मागणी अमेरिकेने प्रस्तावित व्यापार करारात केली आहे.

GM Crop Imports
Indian Agriculture: आत्मनिर्भर की आयात निर्भर

‘जीएम पिकांच्या आयातीला परवानगी द्या’

अमेरिकेत जीएम तंत्रज्ञान आधारित पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिकेला जीएम सोयाबीन, मका, ज्वारी, गव्हांसह इतर शेतीमाल भारताच्या बाजारात विक्रीस आणावयाचा आहे. परंतु भारतात जीएम पिकांना परवानगी नाही. त्यामुळे भारताने या पिकांसाठी आपली बाजारपेठ खुली करावी, यासाठी अमेरिकेने दबाव वाढवायला सुरुवात केली.

आयात शुल्क कमी करण्याची मागणी

अमेरिकेसारखे जास्त अनुदान देऊन स्वस्तामध्ये शेतीमाल विकणाऱ्या देशांच्या मालापासून आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण व्हावे, यासाठी भारताने काही शेतीमालाच्या आयातीवर शुल्क लावले आहे. पण हे आयात शुल्क काढण्यात यावे, अशी मागणी अमेरिका करत आहे. काही जीएम पिकांच्या आयातीवर मोठे आयात शुल्क असल्याने भारतात निर्यात करणे शक्य होत नाही. तसेच इतरही नॉन जीएम पिकांच्या आयातीवर मोठे शुल्क आहे. भारताचे हे धोरण अमेरिकेला पसंत नाही, त्यामुळे भारताने आयात शुल्क कमी करावे, अशी अमेरिकेची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com